करमाळा

करमाळा तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज; वाचा सविस्तर

केत्तूर (अभय माने):  राज्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने पावसाळ्याच्या दिवसातच काही गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

अजूनही विहिरी, तलाव, तसेच धरणेही तळातच आहेत अशा परिस्थितीमध्ये आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काय करावे लागेल पिण्याच्या पाण्याची भीषणता काय होईल हे सांगता येत नाही.

    राज्य शासनाने शासन आपल्या दारी या उपक्रमाद्वारे करोडो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा कमीत कमी पाणीटंचाई ग्रस्त व धरणाच्या भागात तरी एरियल क्लाइड सीडिंग (Aril Cloud Seeding) ही उपाययोजना करून कृत्रिम रित्या पाऊस पाडावा अशी मागणी होत आहे.

    सध्या पावसाळी ढगांची ही उपलब्धता आहे परंतु पाऊस मात्र काही पडायचे नाव घेत नाही. ज्या भागात असे ढग आहेत त्या भागात तरी त्वरित कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा.

      सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे काळाची गरज आहे. आता प्रयोग केल्यास निश्चितच पर्जन्यमानात वाढ होण्यास मदत होईल असे झाल्यास भूगर्भातील पाणी पातळीही निश्चितच वाढ होण्यास मदत होईल.

 त्यातच सध्या पावसाचे ढग अद्याप आहेत अशा वेळेसच कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा पुढे पावसाचे ढग गायब होतील व शासन पावसासाठी आटापिटा करेल म्हणजे ” बैल गेला आणि झोपा केला ” अशीच परिस्थिती निर्माण होईल.

    विमानाने ढगात फवारणी करणे,ढगामध्ये रसायन सोडणे अशा पद्धतीने कृत्रिम पाऊस पडला जातो. राज्यात दुष्काळी परिस्थिती सामना करण्यासाठी यापूर्वी 2003 / 2004 मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला होता.

यंदा बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

सध्या ढग दाटलेले व भरलेले दिसतात मात्र पोषक वातावरण तयार होत नसल्याने पाऊस पडायला तयार नाही त्यामुळे 2004 मध्ये जसा कृत्रिम पवासाचा प्रयोग झाला तसा प्रयोग राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

litsbros

Comment here