उमरड जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कोठावळे बिनविरोध; ‘हे’ आहेत इतर पदाधिकारी
उमरड(प्रतिनिधी); दिनांक 23/09/2023 बालकांच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समिती 17 जून 2010 च्या शासन निर्णयानुसार गठीत केली जाते त्यानुसार आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी आनंदाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री संजय भानुदास कोठावळे तर उपाध्यक्षपदी चांगदेव भारत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून रवींद्र पांडुरंग गिरी, इंद्रजीत हनुमंत बदे यांची व
महिला प्रतिनिधी म्हणून सौ भारती महेंद्र पाखरे, सौ हिना फिरोज पठाण, संजीवनी भीमराव कोंडलकर, सौ सीमा बंकट बदे, सौ प्रियंका प्रमोद पडवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून ग्रामपंचायत सदस्य समाधान हरिचंद्र वलटे यांची तर शिक्षण तज्ञ म्हणून जनार्दन (तात्या )मारकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच लालासाहेब पडवळे माजी सरपंच प्रमोद बदे बापूसाहेब चोरमले उपसरपंच मा.गणेश चौधरी ,मुकेश बदे, संदीप बदे, पोलीस पाटील अंकुश कोठावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समाधान मारकड, भगवान चौधरी, चांगदेव कोठावळे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य ,सोसायटी सदस्य व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी बिनविरोध पार पाडल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सिताराम भिल गुरुजी यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले . नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सन्माननीय सदस्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने व शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Comment here