करमाळा

करमाळा तालुक्यातील 87 कामांसाठी 10 कोटी निधी मंजूर; उर्वरित 221 कामांसाठी 36 कोटी निधीची मागणी, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील 87 कामांसाठी 10 कोटी निधी मंजूर; उर्वरित 221 कामांसाठी 36 कोटी निधीची मागणी, वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी);

             सन 2023 – 24 या आर्थिक वर्षामध्ये 25 15 – 12 38 या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे आपण 46 कोटी निधी ची मागणी केलेली होती.

 त्यापैकी 10 कोटीच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला दिनांक 5 सप्टेंबर 2023 च्या शासन अध्यादेशाद्वारे मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .उर्वरित 221 कामांसाठी 36 कोटी निधी लवकरच मंजूर होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

    याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ,करमाळा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी आपण 25 15 – 12 38 योजने अंतर्गत 308 कामांसाठी 46 कोटी निधीची मागणी केली होती.

 त्यापैकी पहिल्या टप्प्यात 87 कामासाठी 10 कोटी निधी मंजूर झालेले असून या निधीमधून सभामंडप बांधणे, तालीम बांधणे ,रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे ,समाज मंदिर बांधणे ,रस्ता खडीकरण करणे, सामाजिक सभागृह बांधणे ,भूमिगत गटार बांधणे, पेविंग ब्लॉक बसविणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. 

सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून त्या कामांचे इस्टिमेट तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

litsbros

Comment here