करमाळा

जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा करमाळा वंचित बहुजन युवा आघाडीने केला जाहीर निषेध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा करमाळा वंचित बहुजन युवा आघाडीने केला जाहीर निषेध

करमाळा(प्रतिनिधी अलीम शेख); जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठी समाजातील आंदोलनकरांवर पोलिस प्रशासनाकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जचा व सरकारचा आम्ही एका निवेदनाद्वारे जाहीर निषेध करीत आहोत, संबंधित आंदोलन कर्त्यावर ज्या कोणी पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष पद्धतीने लाठी हल्ला केला अशा कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा वंचित बहुजन युवा महाआघाडीचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

 निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. आंदोलन करणे आमचा हक्क आहे. 

कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना, पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी आंदोलनकर्त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, एकीकडे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सत्तेच्या माध्यमातून समाज बांधव यांच्यावर कारवाई म्हणुन अमानवी, अमानुषपणे लाठीमार करून आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवरील अन्यायकारक लाठी चार्ज केला गेला.

 पोलिस अधिकारी व शिंदे फडणवीस, पवार सरकारने दिलेल्या आदेशानुसार हुकुमशाही सरकारचे धोरण लक्षात घेऊन गृहमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने देण्यात आलेला लाठी चार्ज आदेश मानवतेला काळिमा फासणारा व कलंकित करणारा असा आहे. शिंदे फडणवीस यांच्या राक्षसी सरकारचा जाहीर निषेध. असे निवेदनात म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. “सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है”. वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा विभागच्या वतीने मराठा आदोलनकर्त्यांना जाहिर पाठिंबा देत आहोत.

सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री फडणवीससाहेब यांनी आपले राजीनामे द्यावेत अशी मागणी निवेदनाच्या शेवटी साहेबराव वाघमारे यांनी केली आहे.

litsbros

Comment here