करमाळा तालुक्यात शासनाने रोजगार हमीची कामे व पाण्याचे टँकर चालू करावे – गणेश चिवटे
करमाळा (प्रतिनिधी)
:- करमाळा तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे तालुक्यात शासनाने रोजगार हमीची कामे व पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करावेत अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुका शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने पूर्णतः वाया गेला आहे. तसेच पाऊसच ण पडल्याने रब्बी हंगाम ही पेरणीविना गेला आहे. त्यामुळे गावा गावात पिण्याच्या पाण्याचे तीव्र दुर्भीक्ष निर्माण झाले आहे.
जनावरांना व माणसांना पिण्याचे पाणी टंचाई झाली आहे.त्यामुळे गावा गावात पाण्याचे टँकर चालू होणे गरजेचे आहे.तसेच खरीप व रब्बी हंगामातील शेतीतीतलं उत्पन्न बुडाले आहे. रोजगारासाठी लोकांचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होण्याचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे.गाव पातळीवर रोजगार हमीची कामे तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगार हमीची कामे त्वरित सुरु करण्यात यावीत अशी मागणी श्री चिवटे यांनी केली आहे.
Comment here