आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात झिका सदृश्य व्हायरसची लागण ? वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात झिका सदृश्य व्हायरसची लागण ? वाचा सविस्तर

केत्तूर ( अभय माने) पुणे जिल्ह्यात लागण झालेल्या झिका व्हायरसचे रुग्ण करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात येऊन धडकल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अफवांनी जोर धरला आहे. यासाठी आरोग्य विभागाने याबाबत जनतेचे प्रबोधन करावे तसेच झिका बाबत काळजी व खबरदारी चे उपाय सांगावेत अशी मागणी जोर धरत आहे.

पुण्यामध्ये आषाढी वारीच्या अगोदर झिका व्हायरचे रुग्ण सापडले होते त्यामुळे सर्वसामान्यांनीमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

परंतु,नागरिकांनी याबाबत घाबरून जाऊ नये आपला घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी,गटारात औषध फवारावी, खिडक्यांना जाळी लावावी.तसेच कोणताही थंडी, ताप, पुरळ येणे, डोळे लाल होणे,उलटी होणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांची संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी केले आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३०,९९६ अर्जमंजूर : आमदार संजयमामा शिंदे

वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोर्टी आरोग्य केंद्रामध्ये भगतवाडी येथील दोन गर्भवती महिलांना झिका सदृश्य व्हायरची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यांचा पुणे जिल्ह्याची संपर्क आहे असे समजते.

litsbros