करमाळासोलापूर जिल्हा

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो! “आपली जुनीच घराणी बरी, नवा नेता नको..” मकाई निवडणुकीत आजी माजी आमदारांनी बागलांना मदत केल्याची चर्चा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो! “आपली जुनीच घराणी बरी, नवा नेता नको..” मकाई निवडणुकीत आजी माजी आमदारांनी बागलांना मदत केल्याची चर्चा

मकाई निकालानंतर पडद्यामागे झालेल्या राजकीय घडामोडींची चर्चा!!

आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील दोघांचाही बागल गटाला सॉफ्ट कॉर्नर!!!

मात्र जयवंतराव जगताप यांनी केला कडवा विरोध!!!

सविता देवी राजे भोसले नाराज असल्याची चर्चा!

करमाळा ((प्रतिनिधी) मकाईची निवडणूक बागल गटाने जिंकल्यानंतर या निवडणुकीसाठी पडद्यामागे जी चर्चा झाली जी राजकीय गणितं जुळले गेली त्याची आता चर्चा होऊ लागली आहे यातच पश्चिम गटाच्या नेत्या देवी राजे भोसले यांनी आपल्या मीडियाचे फेसबुक पोस्टवर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो अशी पोस्ट करून आपली नाराजी उघड केली आहे.

आर्थिक अडचणीत असलेला मकाई कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी असा सुर बागल गटांनी आवळत आपल्या हस्तकामार्फत संजय मामा शिंदे व नारायण पाटील गटाशी संधान साधले होते

आमदार संजय मामा शिंदे यांनी बागल गटाला या निवडणुकीत सॉफ्ट कॉर्नर देऊन आपल्या सर्व समर्थ कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे धोरण स्वीकारले.

माजी आमदार नारायण पाटील यांनी सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत बागल गटाचा सॉफ्ट कॉर्नर मिळेल या आशेवर मकाई मध्ये निवडणूक लढवणारे आपल्या समर्थ कार्यकर्त्यांना ताकद देण्यात असमर्थता दाखवली.

बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे व नारायण पाटील यांच्यामध्ये मध्यस्थी व समन्वय करण्याचे काम एका पत्रकाराने करून नारायण पाटील गटाला या निवडणुकीतून बागल गटाला सॉफ्ट कॉर्नर मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली

नारायण पाटील समर्थक असलेल्या सविता देवी राजे भोसले सर्व ताकतीने ही निवडणूक लढवण्याच्या इरादांनी निवडणूक मैदानात उतरले होत्या मकाई सहकारी साखर कारखाना उभा करताना शहाजीराजे भोसले यांची महत्त्वाची भूमिका व सिंहाची वाटा होता.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक मध्ये जिंती मधून सरपंच पदासाठी सविता देवी राजे यांच्या पुत्राला बागल गटाकडूनच पराभवाला सामोरे जावे लागले होते यामुळे बागल गटाचा वाचपा काढण्याची संधी सविता देवी राजे भोसले यांना या निमित्ताने आली होती

 निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मंजूर करण्यापासून तर निवडणूक लढवण्यासाठी मदत करण्यासाठी नेतेमंडळींनी नकार दिल्यानंतर सविता देवी राजे भोसले नाराज झाले असल्याची चर्चा आहे.

सवितादेवी राजे भोसले यांचा अर्ज नामंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थक उमेदवारांचे अर्ज पाठीमागे घ्या असा दबावही नेतेमंडळी कडून सविता देवी राजे भोसले यांच्यावर टाकण्यात आल्यानंतर आपल्या समर्थक उमेदवारांच् अर्ज ठेवले यातूनच नाराजीचा सूर लागला आहे.

 

दुसऱ्या बाजूला ज्यांनी सक्षमपणे पॅनल उभा करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्राध्यापक रामदास झोळ यांनीही आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी राजकीय तडजोडी करून बागलांना बिनविरोध निवडणूक देण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करून येणाऱ्या काळात स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या नेत्यांनी मंडळीला धडा दाखवू असा इशारा दिला आहे

या निवडणुकीत प्रा. झोळ सर व सवितादेवी राजेभोसले यांचे उमेदवार निवडून आल्यास त्यांचे तालुक्याच्या राजकारणातील वजन वाढले असते. तसेच याचे राजकीय गट अधिक बळकट झाले असते. ते नेमके कोणाला नको आहे? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

मकाई कारखान्यांची निवडणुकीत बागल गटाला सॉफ्ट कॉर्नर दिल्यानंतर येणाऱ्या राजकीय काळात बागल गट संजय मामा शिंदे गटाला मदत करणार का? नारायण पाटील गटाला मदत करणार.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

 

निवडणुकीचे निमित्ताने तालुका पातळीवर काम करणारी नेते मंडळी आपल्या स्वार्थासाठी दोन नंबर तीन नंबर फळीतील कार्यकर्त्यांचा विचार न करता त्यांच्या भावनेचा विचार न करता कोणालाही पाठिंबा देतात हे स्पष्ट झाल्यामुळे सविता देवी राजे भोसले सारखे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीतून संजय मामा शिंदे _नारायण पाटील गटातील कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येते

litsbros

Comment here