क्राइमपुणे

धक्कादायक: एमपीएससी (MPSC) पास तरुणीचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: एमपीएससी (MPSC) पास तरुणीचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही समोर आले आहे.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार असे या तरुणीच नाव असून ती ८ दिवसांपासून बेपत्ता होती. तसेच ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती.

मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळला आहे. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. 

या तरुणीचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून ८ दिवसांपुर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या काही वस्तूंवरुन या तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे. एमपीएससी पास झालेल्या तरुणीचा असा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

litsbros

Comment here