करमाळासोलापूर जिल्हा

प्रा.झोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मकाई कारखाना निवडणूकी बाबत केली ‘ही’ तक्रार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रा.झोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मकाई कारखाना निवडणूकी बाबत केली ‘ही’ तक्रार

करमाळा(प्रतिनिधी); मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. मकाईच्या निवडणुकीत प्रथमच विरोधी गट निर्माण झाला असून बागल यांच्याकडून कारखाना खेचून घेण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत.

समाजसेवक व दत्तकला संस्थेचे संस्थापक प्राध्यापक रामदास झोळ यांनी नवी आघाडी काढली असून त्या माध्यमातून अनेक दिग्गज एकत्र येत आहेत.

या निवडणूक कार्यक्रमांमध्ये मकाई सहकारी साखर कारखान्याचे प्रशासन बागल विरोधकांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसून अनेक गोष्टी व महत्त्वाची गरजेची माहिती लपवत असल्याचा आरोप प्राध्यापक झोळ यांनी केला आहे.

प्रशासनाकडून विरोधकांना 2017 ते 2023 या काळात कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांच्या नावांची यादी दिली जात नाही तसेच मतदार यादी दिली जात नाही. तसेच कारखान्याच्या शेअरची थकबाकी जमा करण्याची व्यवस्था कारखान्यात व्यवस्थित नसून ती व्यवस्था निवडणूक अधिकारी यांच्याकडेच असावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राध्यापक झोळ व त्यांच्या सहकाऱ्यानी दिले आहे.

प्रा.झोळ व सहकाऱ्यांनी ही मागणी केल्या नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिवाजी तुम्ही संबंधित कारखाना कडूनच मिळवा असे सांगितले परंतु त्यानंतर सहकाऱ्यांनी याविषयी तुम्हीच हस्तक्षेप करावा माहिती मिळवून द्या अशी विनंती केली.

यावेळी प्रा.झोळ यांच्यासह अमोल घुमरे, बापू फरतडे, रवींद्र गोडगे, दीपक शिंदे सुभाष शिंदे सुहास वाळुंजकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here