करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथील महिला नेत्या ॲड सविता शिंदे यांचा करमाळा ते कर्नाटक प्रवास! विधानसभा निवडणुकीत ज्यांचा प्रचार केला ते पाटील झाले चौथ्यांदा आमदार; नक्की वाचा ॲड.शिंदे यांचा अनुभव!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील महिला नेत्या ॲड सविता शिंदे यांचा करमाळा ते कर्नाटक प्रवास! विधानसभा निवडणुकीत ज्यांचा प्रचार केला ते पाटील झाले चौथ्यांदा आमदार; नक्की वाचा ॲड.शिंदे यांचा अनुभव!

करमाळा(प्रतिनिधी); ॲड सविता शिंदे हे नाव करमाळा तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातील महिला व समाजवादी चळवळीला ही आता चांगलेच परिचित आहे. अगदी कमी वयात राज्याच्या पुरोगामी चळवळीत स्वत;ची ओळख निर्माण तर केलीच पण अगदी कमी वयात महिला म्हणून करमाळा विधानसभा निवडणुक लढविण्याचे रेकॉर्ड ही त्यांच्याच नावावर आहे.

कलबुर्गी विधानसभा उमेदवार बी आर पाटील

अशा समाजवादी वर्तुळात राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये नाव असणाऱ्या ॲड शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ही प्रचाराची धुरा सांभाळली. त्याबद्दल निवडणुकीतील अनुभव त्यांनी सोशल मीडियावर मांडला आहे.तो पुढील प्रमाणे..

_______________________________________

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बी. आर. पाटील B. R. Patil हे चौथ्या वेळेस आळंद या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदन! मागच्या वेळेस ते फक्त ५०० मतांनी हरले होते. याआधी एकदा १७०० मतांनी. या पूर्वी B. R. Patil यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापतीपदही भूषविले आहे. 

बी. आर. पाटील हे काँगेस पक्षाकडून निवडून आले असले तरी ते मूळचे समाजवादी विचारांचे, निवडणुकीच्या भाषणात ही ते समाजवाद, डॉ. राममनोहर लोहिया व इतर समाजवादी नेत्यांचा उल्लेख करतात. आजही वयाच्या ७४ व्या वर्षी देखील देशभरात चालू असलेल्या सर्व जन आंदोलनात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळेच देशभरातून जन चळवळीतील नेते, कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी आले होते. 

माझी व बी. आर. पाटील यांची ओळखही अनेक वर्षांची.. मी प्रचाराचे शेवटचे दोन दिवस बी. आर. पाटील यांच्या प्रचारासाठी गेले होते. ७ तारखेला सकाळी मी कलबुर्गी येथे पोहचले. तिथून मिळेल त्या वाहनाने तासाभराचा प्रवास करून आळंद या त्यांच्या मतदारसंघात जाता येईल असा विचार होता. पण त्यांचा निरोप आला की, कलबुर्गी येथे त्यांची सकाळी ८ वाजता पत्रकार परिषद आहे.

ती झाली की ते स्वतः मला आळंद येथे घेऊन जातील. मी पोहचल्यावर कॉल केला तर स्टेशनवरच थांब म्हणाले. निवडणुक प्रचाराचे केवळ दोनच दिवस राहिले असताना स्वतः मला स्टेशनवर घ्यायला आले. बरोबर कार्यकर्त्यांचा लवाजमा ही नाही ड्रायव्हर व ते स्वतः. जाताना एके ठिकाणी थांबून नाष्टा करायला लावला.

मग कलबुर्गी येथे एका कार्यकर्ता असलेल्या कॅन्सरच्या रुग्णाला भेटले. त्यानंतर तासाभरात आम्ही त्यांच्या संस्थेच्या आवारात पोहचलो. वाटले इथे कुठेतरी माझी थांबण्याची व्यवस्था केली असावी. तर थेट स्वतःच्या घरी घेऊन गेले. (त्यांची आई, पत्नी, सून या महाराष्ट्रतील त्यामुळे अर्थातच घरात सर्वजण मराठी बोलतात.)

त्यानंतर कार्यालयात भाजप मधून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी बरेच कार्यकर्ते आले होते. त्यांचे प्रवेश झाले. मग गावोगावी कोपरा सभा, भेटीगाठी दुपारचे जेवण ५:०० वा. एका कार्यकर्त्यांच्या घरीच झाले. संध्याकाळी एक मोठी सभा त्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बसवराज पाटील #BasavrajPatil, मध्यप्रदेशचे माजी आमदार डॉ. सुनीलम #Sunilam ज्येष्ठ विचारवंत लेखक सुधींद्र कुलकर्णी #Sudhindra Kulkarni, उत्तरप्रदेश समाजवादी पार्टीचे किशनसिंह तोमर ही होते. उत्स्फूर्तपणे लोक सभेत सहभागी झाले होते. त्यानंतरही दोन छोट्या सभा…दरम्यान मला मायग्रेन व पित्ताचा त्रास सुरू झाला तर बी. आर. पाटील स्वतः डॉकटरकडे घेऊन गेले. 

कर्नाटक कलबुर्गी मतदारसंघ प्रचारातील काही चित्रे 

सांगायचे तात्पर्य इतका साधा, पदाचा कसलाही अभिनिवेश नसलेला नेता विरळाच…

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारफेरी व कॉर्नर सभांसाठी हजारो कार्यकर्ते जमले होते. या दिवशी बिहारचे माजी मंत्री अखलाख अहमदही होते. त्या मतदारसंघात बरेच लोक मराठी बोलणारे व समजणारेही जवळजवळ सर्वच त्यामुळे मला सर्व ठिकाणी बी. आर. पाटील यांनी मराठीतच भाषण करण्यास सांगितले. 

सुधींद्र कुलकर्णींनी आपल्या भाषणात बी. आर. पाटील यांचा उल्लेख सज्जन नेता असा केला.. आजच्या काळात राजकारणात सज्जन नेता असण्याचे हे खरेच दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण आहे असेच म्हणावे लागेल.

litsbros

Comment here