करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्याचे जावई निवळकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्याचे जावई निवळकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी):
शुन्य मशागतीच्या धर्तीवर राज्यभर कार्य करून शेतक-याना आर्थिक संपन्न बनविण्याचा विडा उचलणा-या कृषी क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणा-या अनिल निवळकर यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ या ठिकाणी एस आर टी शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी मित्र अनिल निवळकर यांचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.

अनिल निवळकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा करमाळ्याचे संघटक चक्रधर पाटील यांचे ते जावई होत. श्री अनिल निवळकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तमरीत्या राबवला आहे. शेतक-यांचा मशागतीवरील खर्च अंत्यत कमी करण्याची पध्दत ही निवळकर हे प्रबोधन करून सागंत आहेत.

जमीन तयार करणे व पिक पेरणी पासुन काढणी पर्यंत हा शेतक-यांचा फायदेशीर उपक्रम आहे. शेतीची मशागत न करता पिकाचे विक्रमी उत्पन्न घेणे हा यामागचा उद्देश आहे असे कृषी मित्र अनिल निवळकर यांनी सांगितले.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात मासे पकडण्यासाठी विषारी औषधाचा वापर, जनतेचे आरोग्य धोक्यात; संबंधितावर गुन्हे दाखल करा शिवसेनेचे मागणी

रिटेवाडी व केतुर या दोन्ही उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा; जलसंपदा विभागाने दिला सकारात्मक अहवाल

हा शुन्य मशागतीचा उपक्रम राबविल्याबद्दल व शेतक-याच्या उपयोगी एस आर टी तंत्रज्ञानाला निवळकर यांनी अधिक अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून प्रगतशील शेतकरी होण्यास मदत केल्याबद्दल त्यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यापूर्वीही दोन पुरस्कार अनिल निवळकर यांना मिळाले आहेत.त्याच्या या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

litsbros

Comment here