करमाळा

देवळालीत माजी आ.नारायण पाटील गटाला धक्का; ‘या’ ग्रामपंचायत सदस्याचा आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

देवळालीत माजी आ.नारायण पाटील गटाला धक्का; ‘या’ ग्रामपंचायत सदस्याचा आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवळाली गावाचा प्रभाव करमाळा तालुक्याच्या राजकारणावर ठळकपणे दिसून येतो. पूर्वीपासून या गावात जगताप गट, बागल गट आणि पाटील गट यांचा वरचष्मा होता, परंतु गेल्या 2 वर्षापासून देवळाली गावांमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांचा गट मजबूत स्थितीत आलेला असून माजी आमदार बागल व पाटील गटाला धक्क्यामागून धक्के या गावांमध्ये बसत आहेत.

        यापूर्वीच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी बागल गटाला सोडचिट्टी देऊन त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला होता. आज पाटील गटाच्या ग्रामपंचायत सदस्य सौ सविता चौधरी यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्यामुळे हा नारायण पाटील गटाला मोठा धक्का मानला जात आहे . देवळाली ग्रामपंचायत सुद्धा आमदार संजय मामा शिंदे गटाच्या ताब्यात आहे. 

         आजच्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी देवळाली गावचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर, माजी सरपंच आशिष (अण्णा )गायकवाड, उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रा.प.सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे,अण्णासाहेब कानगुडे ,संजय चौधरी चेअरमन रामभाऊ रायकर, संजय कानगुडे,

बाळासाहेब गोरे गुरुजी, सुजित तात्या बागल, बंडू काका शेळके, बारीक गोसावी,दत्तू कानगुडे,ज्योतीराम गुंड,बापू गुंड,परमिल गुंड, बाळासाहेब गायकवाड ,संदीप गायकवाड, महेश झोळे, अमोल गोसावी, देविदास चौधरी ,चांगदेव झोळे, रोहिदास शेळके ,

मधुकर शेळके, राजेंद्र सरडे ,इंद्रजीत शिंदे उमेश निमगिरे, रेवनाथ शेळके, राज अवताडे ,साहेबराव चौधरी ,आजिनाथ शेळके ,दगडू चौधरी उपस्थित होते.

litsbros

Comment here