आर्या स्कूलची वृषाली शिंदे 98.40 गुण प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यात प्रथम
स्कूलच्या 19 विद्यार्थ्यांनी पटकावले 90 टक्के पेक्षा अधिक गुण
सलग सातव्या वर्षी 10 वीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम
माढा / प्रतिनिधी -(राजेंद्र गुंड-पाटील)
–माढा तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगांव (टें) संचलित, पिंपळनेर येथील आर्या पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सलग सातव्या वर्षी 100 टक्के लागला असून स्कूलची विद्यार्थ्यीनी वृषाली शिंदे हिने 98.40 टक्के गुण प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.स्कूलमधील 19 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे गणित,आर्टिफिशयल इंटेलिजन्स,कृषीशास्त्र या विषयांमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्यांने 100 पैकी 100 गुण प्राप्त करून नवीन रेकॉर्ड स्थापित केले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस बसलेले सर्व 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 19 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक गुण,8 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून आणि 46 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.स्कूलमध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक वृषाली शिंदे 98.40 टक्के,द्वितीय क्रमांक अपेक्षा काळे 98.20 टक्के,तृतीय क्रमांक तेजस्विनी दोरास्वामी 97.20 टक्के, चतुर्थ क्रमांक कृष्णा रणजितसिंह शिंदे 96.60 टक्के व पाचवा क्रमांक प्रेरणा शिंदे हिने 96.40 टक्के गुण मिळवत पटकावला आहे.या वर्षीच्या निकालात पिंपळनेर येथील ग्रामीण भागातील आर्या पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यीनी कु.वृषाली शिंदे हिने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध नामांकित स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त गुण प्राप्त करून नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
या यशाबद्दल संस्थापक-अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे,पंचायत समितीचे सदस्य धनराज शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे,प्राचार्य रवींद्र लोखंडे, उपप्राचार्य अन्वर मुलाणी,प्राचार्य रणजित उबाळे,स्वाती मराळ, दादासाहेब अधटराव,सचिन पवार,राहुल सोमासे,हर्षद शिंदे,शोएब शेख,स्वप्निल झांबरे,राशी वाळेकर, संजय गायकवाड,प्रियांका कन्नडकर, कुमार बडे,सतिश वरपे यांच्यासह पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.
फोटो ओळी 1) वृषाली शिंदे – प्रथम क्रमांक
2) अपेक्षा काळे – द्वितीय क्रमांक
3) तेजस्विनी दोरास्वामी – तृतीय क्रमांक
4) कृष्णा रणजितसिंह शिंदे – चतुर्थ क्रमांक
5) प्रेरणा शिंदे – पाचवा क्रमांक
Comment here