करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा एसटी स्टँडवर आढळला बेवारस मृतदेह, प्रवाशांमधे खळबळ
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा एसटी स्टँडवर बेवारस मृतदेह दिसून आल्याची माहिती एसटी प्रशासन व नागरिकांनी करमाळा पोलिसांना दिली. त्यानंतर करमाळा पोलिसांनी तातडीने एसटी स्टँडवर येऊन सदर मृतदेहाची पाहणी केली व ताब्यात घेऊन तो मृतदेह करमाळा कुटीर रुग्णालयात पोहोचवला.
मागील दोन दिवसापासून सदर व्यक्ती करमाळा एस टी स्टँडवर दिसून येत होता. आज त्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रवाशांत खळबळ उडाली आहे.
अद्याप सदर मृत व्यक्तीचे नाव समजलेले नाही. करमाळा पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.
Comment here