ब्रेकिंग; बिनविरोध निवडी; करमाळा बाजार समितीच्या सभापती पदी पुनश्च जयवंतराव जगताप तर उपसभापती पदी..
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयंतराव जगताप यांची तर उपसभापती पदी पांडे येथील जगताप गटाचे शैलजा मेहर यांची विजयादशमीच्या दिवशी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.
यावर्षी पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने बाजार समिती बिनविरोध झाली होती. त्यानंतर आज (मंगळवार) विजयी दशमीदिवशी करमाळा बाजार समिती येथे सभापतीपदाची निवडणूक झाली. त्यात जगताप यांची निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी शैलजा मेहर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
करमाळा बाजार समितीची 18 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्या सर्व 18 जागा बिनविरोध झाल्या होत्या.
यामध्ये पाटील व बागल गटाला प्रत्येकी दोन- दोन जागा मिळाल्या होत्या. व्यापारी गटात दोनच अर्ज दाखल झाल्याने जगताप गटाच्या दोन जागा सुरुवातीला बिनविरोध झाल्या होत्या. सावंत गटाची हमाल तोलारमधील एक जागा बिनविरोध झाली होती.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोहिते पाटील यांनी जगताप, पाटील व बागल गटाचा समजोता केला त्यात सर्व अर्ज मागे निघाले. शिंदे गटाने सुरुवातीलाच जगताप यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतले होते.
यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, विलास गुंडगीरे, सागर दोंड, जनार्धन नलवडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे. साधना पवार, शौलजा मेहर. शिवजी राखुंडे. नागनाथ लकडे. कशीनाथ काकडे, नवनाथ झोळ, बाळू पवार, कुलदीप पाटील. मनोज पितळे व परेशकुमार दोशी. वालचंद रोडगे. हे संचालक उपस्थित होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती माजी आमदार जयंतराव जगताप बोलताना म्हणाले की सदरची संस्था ही स्वातंत्र्यसैनिक तसेच माजी आमदार कैलासवासी नामदेवराव जगताप यांच्या आशीर्वादाने सदरची संस्था ही आज राज्यात एक आदर्शवत संस्था म्हणून कार्यरत आहे.
मला पुनश्च सभापती पदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व गटाचे मनापासून आभार मानतो आपण सर्वजण एक दिलाने काम करू असेही ते भाषणात बोलतांना म्हणाले. यावेळी आभार व सूत्रसंचालन पत्रकार अशोक नरसाळे यांनी केले.
Comment here