सरपंच पदाचे उमेदवार गुलदस्त्यात.. केतूरमध्ये कोण असणार कुणाचा उमेदवार? माघारीकडे सर्वांचे लक्ष!
केतूर (अभय माने): केतूर ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून वेगवेगळ्या गटातर्फे सरपंचपद तसेच सदस्य पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज छाननी वेळी अपवाद वगळता कोणाची तक्रार नसल्याने सर्व अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
सध्या तरी सरपंचपदाच्या एका जागेसाठी 12 व अकरा सदस्य पदासाठी 44 अर्ज दाखल आहेत. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बापुसाहेब पाटील एडवोकेट अजित विघ्ने,
मकाईचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे,व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटील,देवराव नवले, प्रशांत नवले, माजी सरपंच विलास कोकणे,उदयसिंह मोरे पाटील या सर्वांचा सरपंच पदाचा उमेदवार कोण राहणार ? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.हे बदुदा उदया गुरुवार दि.25 ) रोजी समजणार असल्याने याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
सरपंच पदासाठी किती उमेदवार राहणार हे आता उद्याच समजणार आहे. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण चार प्रभागातून 44 अर्ज आले आहेत यापैकी किती अर्ज शिल्लक राहणार व कोण माघार घेणार यावरच सदस्य पदासाठी दुरंगी लढत होणार की तिरंगी होणार हे समजणार आहे.
प्रभाग एक मधून 8, प्रभाग दोन मधून दोन 18, प्रभाग तीन मधून 8 तर प्रभाग चार मधून 10 अर्ज दाखल झाले आहेत.
Comment here