करमाळा नगरपरिषद बांधकाम ठेकेदाराची चौकशी करा; या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार!
करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा नगरपरिषदेने बांधकाम ठेकेदाराला दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर देऊन ही रस्त्याचे काम न केलेल्या ठेकेदाराची चौकशी होत नसल्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी दिली.
यावेळी जमादार म्हणाले की करमाळा नगरपरिषदेने संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे हे काम बांधकाम ठेकेदार दिग्विजय देशमुख यांना दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर दिली होती परंतु संबंधित ठेकेदाराने अद्याप पर्यंत काम केलेले नाही मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांच्या कडे अनेक वेळा तोंडी लेखी स्वरूपात तक्रार केली होती.
तसेच जिल्हाधिकारी सोलापूर तसेच पालकमंत्री सोलापूर यांच्या कडे तक्रार केल्यानंतर करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांचे योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करावा असे पत्र मुख्याधिकारी साहेब करमाळा नगरपरिषद यांना आलेले असताना सुद्धा आज पर्यंत संबंधित ठेकेदाराला कामासंदर्भात एक ही पत्र नगरपरिषदेने दिलेले नाही.
मुख्याधिकारी साहेब सदर बाबतीत टाळाटाळ करत असुन या कामाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी या साठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती जमादार यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूकदार आक्रमक; वाहतुक दरवाढीसाठी निवेदन देत संपावर जाण्याचा पवित्रा
सदर अर्जाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर, आमदार करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ, जिल्हा पोलिस प्रमुख सोलापूर (ग्रामीण,), उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी, तहसीलदार करमाळा, पोलिस निरीक्षक करमाळा ,मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना देण्यात आले आहेत
Comment here