महाराष्ट्रमाढासोलापूर जिल्हा

जागतिक महिला दिन विशेष! टेम्पो चालवून हाकते ती संसाराचा गाडा; अंजनगावच्या सुनेची अभिमानास्पद कहाणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जागतिक महिला दिन विशेष!
टेम्पो चालवून हाकते ती संसाराचा गाडा; अंजनगावच्या सुनेची अभिमानास्पद कहाणी

माढा(प्रतिनिधी); सध्या आपण जर पाहिले तर स्त्री अनेक भूमिका असतात.मुलगी,आई,मावशी,आजी,सून,बायको,जाऊ,नणंद,बहीण या नात्यातल्या अनेक जबाबदाऱ्या स्त्री पार पाडत आहे.काही वर्षांपूर्वी स्त्री फक्त चुल आणि मुल या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देत होती.परंतु जसा काळ बदलला तशी स्त्री देखील कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे राहिली नाही. देशाचे सर्वोच्च असलेले पंतप्रधान पद देखील स्त्री मिळवले आहे. याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणे महिला देखील मागे नाहीत

संसाररूपी रथ चालवायचा असेल तर नवरा आणि बायको ही दोघेही चाके महत्वाचे आहेत.तरच संसाराचा रथ व्यवस्थित चालतो.अनेक महिला आपल्या संसारासाठी आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने उभ्या राहतात. अडचणीत त्यांना साथ देतात.अशीच कहाणी आहे अंजनगाव खेलोबा येथील सोनाली धनाजी पाटेकर यांची.


अंजनगाव येथील धनाजी पाटेकर आणि सोनाली पाटेकर हे जोडपे. धनाजी हे स्व:त गाडी चालवून घर सांभाळत होते.अचानक धनाजी पाटेकर यांच्या मनक्याचे ऑपरेशन करावे लागले. धनाजी पाटेकर हे टेम्पो चालवून संसाराला हातभार लावत होते. परंतु ऑपरेशन नंतर त्यांना जास्त दिवस विश्रांती घेणे शक्य नव्हते.पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे मणक्याचे दुखणे वाढत गेले. त्यामूळे त्यांना टेम्पो चालविणे अशक्य झाले.संसराचा गाढा कसा चालवावयाचा हा गंभीर प्रश्न धनाजी आणि सोनाली यांच्यापुढे होता. त्यातच दोन मुलांच्या शिक्षाणाचा खर्च होता. तेव्हा सोनाली पाटेकर यांनी स्वत: टेम्पो चालविण्याचा व संसाराचा गाढा ओढण्याचे ठरविले.

आज त्या पुरूषाप्रमाणे टेम्पो चालवून संसाराचा गाढा ओढत आहेत.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. सोनाली पाटेकर या मागील एक ते दीड वर्षापासून स्व:त गाडी चालवत आहेत.दररोज अंजनगाव ते अनगर येथील घाटुळे येथील नर्सरी येथे त्या कामासाठी अनेक महिलांना आपल्यासोबत घेऊन जात आहेत.अंजनगावलाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला हेवा वाटावा, असे काम करीत आहेत. पत्नी ही अर्धागिणी असते. संसाराचा गाडा ती आपल्या पतीबरोबर ओढत असते.

हेही वाचा – जिंती जवळ रेल्वे मालगाडीचे कपलिंग तुटल्याने गाडीचे दोन भाग; इतर प्रवासी गाड्या अडीच तास लेट, प्रवाशांचे हाल

दारफळचे केदार बारबोले यांचा ग्रामस्थ व मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार

धनाजी पाटेकर व सोनाली पाटेकर ही जोडी आपल्या संसाराचा गाढा ओढत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनगाव व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

मला सततच्या गाडी चालवण्याने मणक्याचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढतच गेला आणि मला मणक्याचे ऑपरेशन करावे लागले.जागेवर उठणे देखील शक्य नव्हते. यातच संसाराचा खर्च, माझ्या औषधाचा खर्च आणि दोन मुलांच्या शिक्षण यामुळे अवस्था खूप बिकट झाली होती. कधी कधी माझे जीवन संपवण्याचा मनात येत असे. परंतू माझी बायको सोनाली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीली. गाडी चालवण्यास शिकली आणि आज तिने माझी जागा घेतली. आमच्या संसाराची जबाबदारी तिने स्विकारली. मला सोनाली हिचा खूप अभिमान वाटतो.

धनाजी पाटेकर
(सोनाली पाटेकर यांचे पती)

ही बाब अंजनगावकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद व कौस्तुकास्तव आहे.त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे व इतर महीलांनी त्याच्या या कार्यापासून प्रेरणा घ्यावी.

litsbros

Comment here