करमाळामहाराष्ट्रराज्य

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी ची भाडेवाढ; प्रवाशांतून नाराजी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी ची भाडेवाढ; प्रवाशांतून नाराजी

केत्तूर (अभय माने) सर्वसामान्य सध्या आर्थिक संकटात आहे अशा परिस्थितीत जनतेला आर्थिक सोडती व आर्थिक मदत देण्याऐवजी अन्यायकारक आहे. सध्या शाळांच्या परीक्षा झाल्या असून शाळांना दिवाळी सुट्टी लागली आहे परंतु एस्.टी.बसच्या तिकिटाच्या दरात 10 टक्के हंगामी भाडेवाढ केल्याने प्रवाशातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

ही प्रवासी हंगामी भाडेवाढ मंगळवार (ता.8) पासून ते 27 नोव्हेंबर लागू करण्यात येणार आहे याबरोबरच खाजगी बसचीही तिकीट दरवाढ होणार आहे.ही हंगामी दरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अड.अजित विघ्ने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

पावसाने ठेंगा दाखविल्याने दुष्काळी परिस्थिती आहे राज्यातील अनेक तालुके दुष्काळाच्या छायेखाली आहेत.शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे तर दुसरीकडे बेरोजगारी, महागाई रोजच वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात आला आहे.

हेही वाचा – के.के.लाईफस्टाईल करमाळा येथे दिवाळी ऑफर “हमखास बक्षीस योजना” सुरू ; ‘या’ लकी ग्राहकाला मिळाला सॅमसंग मोबाईल गिफ्ट

करमाळा तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या कामासाठी 2 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती, वाचा सविस्तर

दिवाळीच्या तोंडावर ही हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सरसकट 10 टक्के भाडेवाढ सुरू झाली आहे ही हंगामी भाडेवाढ सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

litsbros

Comment here