करमाळाक्रीडासोलापूर जिल्हा

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त केत्तूर येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान; लाखोंची बक्षिसे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त केत्तूर येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान; लाखोंची बक्षिसे

केत्तूर (अभय माने) .केत्तूर (ता.करमाळा) येथे सोमवार (ता.5) रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य अशा निकाली कुस्त्यांचे मैदान व रविवार (ता.14 ) रोजी प्रतिमापूजन व मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

नियोजित कुस्ती मैदान पैकी महत्त्वाची कुस्ती ही मुन्ना झुंझुरके विरुद्ध समाधान पाटील यांच्यामध्ये होणार असून या कुस्तीकरिता इनाम रक्कम एक लाख 51 हजार ठेवण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे दुसरी मोठी कुस्ती सुहास गोडगे व संतोष जगताप यांच्यामध्ये एक लाख एकवीस हजाराची होणार आहे व तिसरी महत्त्वाची कुस्ती प्रशांत जगताप व सतपाल सोनटक्के यांच्यामध्ये एक लाख 11000 साठी होणार आहे.

नेमलेल्या कुस्ती व्यतिरिक्त लहान गटातील मैदाना दिवशीचे मल्ल उपस्थित राहतील त्यांच्या कुस्त्या सकाळी 11 ते 2 या वेळेत नेमण्यात येणार आहेत. सदर कुस्ती मैदानाचे उद्घाटन हे करमाळा पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा – गावच्या सूनबाईची गावात पोस्ट मास्तर म्हणून नेमणूक; निंभोरेकरांनी केला सन्मान

घारगावच्या सरपंच श्रीमती लक्ष्मी सरवदे या डॉ. बी.आर.आंबेडकर रत्न अवार्ड 2023 पुरस्काराने सन्मानित

तरी करमाळा तालुका व परिसरातील सर्व कुस्ती शौकिनांनी या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा असे संयोजकाच्या वतीने उदय खाटमोडे-पाटील यांनी आवाहन केले.

litsbros

Comment here