देवडीचे डॉ.ओंकार थोरात यांची पशुधन विकास अधिकारी वर्ग-1 पदी निवड
माढा / प्रतिनिधी – मोहोळ तालुक्यातील देवडीचे रहिवासी व सध्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सत्यवान बापूराव थोरात यांचे सुपुत्र डॉ.ओंकार थोरात यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पशुधन विकास अधिकारी वर्ग-1 पदी निवड झाली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या या स्पर्धा परीक्षेत ओंकार थोरात याने लेखी व तोंडी परीक्षेत 250 पैकी 149.50 गुण प्राप्त करून खुल्या संवर्गातून राज्यात 42 क्रमांक पटकावला आहे. त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे याकरिता त्याने कोठेही खाजगी शिकवणी वर्ग लावला नव्हता.त्याचे प्राथमिक शिक्षण देवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वालचंद कॉलेज सोलापूर येथे,उदगीर येथे बीव्हीएससी पदवी तर नागपूर येथे एमव्हीएससीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
या यशाबद्दल त्याचे अभिनंदन सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,रामचंद्र घोंगाणे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी बंडू शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी तळेकर, चेअरमन पांडुरंग चौगुले,उपसरपंच भागवत चौगुले,डॉ.नागनाथ थोरात, जोतीराम थोरात,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड, विनोद खेडकर,इंजिनिअर रवींद्र घोंगाणे,रणजित खेडकर यांच्यासह ग्रामस्थ,नातेवाईक व मित्रमंडळींनी केले आहे.
टणू ते चांदज रस्त्यासह भीमा नदीवरील पुलासाठी नाबार्ड मधून 25 कोटी निधी मंजूर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शालेय स्तरापासूनच विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे. पाठ्यपुस्तकांचे वाचन व लेखनाचा भरपूर सराव करावा.विद्यार्थ्यांनी अपयश आले तरी न खचता जोपर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रयत्न, जिद्द व चिकाटी सोडू नये. आईवडिलांच्या कष्टाची व त्यागाची जाणीव ठेवावी. शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन केल्यास नक्कीच यश मिळते अशी प्रतिक्रिया नूतन पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांनी दिली आहे.
फोटो ओळी – डॉ. ओंकार थोरात.
Comment here