दोनशे पेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटे काढली पण ती रेल्वे जेऊरला नीट थांबलीच नाही; जाता न आल्याने प्रवाशांना मनस्ताप व हाल
करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); आज जेऊर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या सोलापूर पुणे मुंबई इंद्रायणी सुपरफास्ट या गाडीला जेऊर स्थानकावरून गाडी प्रवाशांना चढताना न आल्यामुळे 100 ते 200 प्रवासी खाली राहिले व त्याच्यात काही विद्यार्थी होते त्यांचे उद्या पेपर होते वृद्ध महिला होत्या, महिलांना गाडी चढताना आल्यामुळे काही काही महिला खाली पडल्या तसेच काही ज्येष्ठ नागरिक होते त्यांना गाडी चढता न आल्यामुळे हे सर्व प्रवासी खाली राहिले, रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे रेल्वे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
प्रवासी संघटना आणि सर्वजण प्रवासी मिळून स्टेशन मास्तरांकडे गेले असता मागून येणारी पुणे, मुंबईच्या दिशेने कोणती गाडी असेल जाणारी तर तिला थांबवण्याची विनंती केली तर स्टेशन मास्तर यांनी कंट्रोल ऑफिस सोलापूर यांच्याशी संपर्क केला असता डायव्हर्ट केलेली कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस काही वेळात येणार होती. ही गाडी थांबवण्यास विनंती केली असता कंट्रोल ऑफिस यांनी नकार देण्यात आला.
त्यामुळे शेकडो प्रवासी खाली राहिले अनेक जणांनी तिकीट कॅन्सल केली व शेकडो प्रवासी स्टेशनवर तसेच बसून राहिले व रात्रीच्या गाडीची वाट पाहत आहेत असे झाल्यामुळे काही मुलांचे पेपर चुकणार आहेत,त्यामुळे हा प्रवाशांवर होणारा रेल्वे प्रशासनाकडून अन्याय आहे.
जनरल तिकीट कॅन्सल करताना तिकीटातील प्रत्येक व्यक्तीस तिकीट कॅन्सल करताना 30 रुपये कपात होणार आहेत हा भुर्दंड सर्वसामान्यांना कशासाठी. अनेक वेळा जेऊर स्थानकावर हुतात्मा व उद्यान या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मागून ही थांबा दिला जात नाही हा असा किती दिवस अन्याय रेल्वे प्रशासन जेऊर व त्या परिसरातील प्रवासी व नागरिकांवर करणार आहे.
असा सवाल जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर सुभाष सुराणा तसेच अध्यक्ष सुहास सूर्यवंशी तसेच प्रवीण करे यांनी केले आहे
Comment here