भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल जल्लोष
करमाळा(प्रतिनिधी); दिनांक 24 ऑगस्ट रोजी दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलने आनंद साजरा केला. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा आदरणीय सौ.माया झोळ मॅडम तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय डॉ.विशाल बाबर सर यांच्या संकल्पनेतून या सुंदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रचंड प्रेम माया आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण व्हावी तसेच दत्तकला शिक्षण संस्थेतील एखादा विद्यार्थी भारत देशाचा पुढे शास्त्रज्ञ बनावा हाच या उपक्रमाच्या मागचा हेतू होता आज या उपक्रमात चांद्रयान 3 मोहिमेबद्दल बरीच माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली चंद्रयान उड्डाण झाल्यापासून ते चंद्रावरती पोहोचायला त्याला किती वेळ लागला ही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
भारतीय शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासूनच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण च्या मदतीने हे यान चंद्रावरती कसे पाठवले या चंद्रावरती पाठवण्याच्या मागचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले .चंद्रावर दक्षिण ध्रुवाकडे जाणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरला आहे.
त्याचबरोबर पृथ्वीवरून चंद्रावर हे यान कसे पोहोचलं आणि पृथ्वीवरून चंद्रावरची एक बाजू कशी दिसते हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. लॅन्डर कुठे उतरून त्याची कामगिरी कशी असेल चंद्रावरती थंड पाणी आहे का तसेच त्या पाण्यात खनिजे आढळतात का तिथली माती कशी आहे ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
हेही वाचा – कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडा; जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांची मागणी
ब्रेकिंग; सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावर बाजार बंद करण्याचा निर्णय ; जनावरे वाहतूकही बंद
यावेळी ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ ताटे मॅडम दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य यादव मॅडम इन्चार्ज प्राध्यापक धर्मेंद्र धेंडे , इन्चार्ज प्रा खाडे मॅडम हे उपस्थित होते.
यावेळी चंद्रयानाची सर्व माहिती कदम मॅडम व खोमणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंदात हा उपक्रम साजरा केला.
Comment here