करमाळा

कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडा; जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडा; जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी); कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडण्यात यावी अशी मागणी जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी जलसंपदां मंत्री कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील मौजे भोसे येथील तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात यावे कारण चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. 

या भागात पाऊस खूपच कमी पडला असून पाण्या अभावी खरीप हंगामातील पिके जळून चालली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. असे निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे. तरी भोसे तलावात शेतीपंपा साठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे.

या तलावातील पाण्याचा फायदा भोसे, रावगांव, हिवरवाडी या गावातील शेतीसाठी व पशु पक्ष्यासाठी होईल.या तलावात पाणी सोडण्याची खूप गरज आहे. सध्या कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे . या मागणीचा विचार करून वेळीच पाणी सोडण्यात यावे असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

 निवेदनाच्या प्रति अधिक माहितीसाठी आमदार संजय मामा शिंदे खासदार रामराजे निंबाळकर तसेच कुकडी चे कार्यकारी अभियंता यांचेकडे पाठवण्यात आली आहे.

 संबंधित लोक प्रतिनिधी व अधिकारी म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंतीही जगताप गटाचे युवानेते तथा खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केली आहे.

litsbros

Comment here