महाराष्ट्रराज्यशेती - व्यापार

भाजीपाल्याचे दर गडगडले टोमॅटोची लाली कायम तर मिरचीचा ठसका बटाटा स्थिर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*भाजीपाल्याचे दर गडगडले*
*टोमॅटोची लाली कायम तर मिरचीचा ठसका बटाटा स्थिर*

केत्तूर (अभय माने) सतत पडणाऱ्या पावसामुळे पालेभाज्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे त्यामुळे मेथी, पालक, कोथिंबीर इत्यादी पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे पर्यायाने बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दर मात्र घसरले आहेत.पालेभाज्यांचे दर घसरले असले तरी टोमॅटोची लाली मात्र कायम आहे तर हिरव्या मिरचीचा ठसकाही कायम आहे तसेच बटाट्याचे भाव मात्र स्थिर आहेत.

महिन्याभरापूर्वी करमाळा तालुक्याच्या आठवडे बाजारात पालेभाज्यांचे वाढलेले दर एकदम कमी झाल्याने गृहिणींना मात्र दिलासा मिळाला आहे.अनेकांच्या आहारात पालेभाज्या वाढल्या आहेत.

हेही वाचा – कटला जातीचे दोन मासे देऊन केला मच्छीमार बांधवांनी आमदार भरणे यांचा केला आगळावेगळा सत्कार

वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणे झाले आहेत

मेथी 10 रुपये पेंडी, कोथिंबीर 5 रुपये पेंडी ,15 रुपये पेंडी, चुका 7 रुपये पेंडी, बटाटा 50 रुपये किलो,कांदा 35 ते 40 रुपये किलो, टोमॅटो 80 रुपये किलो,वांगी 40 रुपये किलो, कोबी 50 रुपये किलो, फ्लॉवर 50 रुपये किलो,दोडका 40 रुपये किलो, गवार 70 रुपये किलो, भेंडी 60 रुपये किलो,लसुन 200 ते 220 रुपये किलो,हिरवी मिरची 80 ते 100 रुपये किलो

छायाचित्र: भाजीपाला (संग्रहित)

litsbros