माढाराजकारणसोलापूर जिल्हा

अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी अरुणा चौगुले; खेलोबा आघाडीची एकहाती सत्ता; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी अरुणा प्रदीप चौगुले 410 मतांनी निवड

आ.बबनदादा शिंदे प्रणित खेलोबा ग्रामविकास आघाडीने केली एकहाती सत्ता काबीज

माढा प्रतिनिधी
रविवारी 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक झाली.या निवडणुकीतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव व चेअरमन पांडुरंग चौगुले यांच्या नेतृत्वाखालील आ.बबनदादा शिंदे प्रणित खेलोबा ग्रामविकास आघाडी व माजी सरपंच आप्पाराव वाघमोडे व माजी उपसरपंच आजीनाथ इंगळे यांच्या नेतृत्वाखालील आ.दादा- मामा ग्रामविकास ग्रामदैवत श्री खेलोबा प्रणित बहुजन आघाडी या दोन गटांमध्ये लढवण्यात आली होती.

या अटातटीच्या निवडणुकीत आ.बबनदादा शिंदे प्रणित खेलोबा ग्रामविकास आघाडीला एकहाती विजय मिळवण्यात यश आले आहे.थेट जनतेतून सरपंच म्हणून जनतेने निवडून दिलेल्या अरुणा प्रदीप चौगुले या 410 मतांनी विजयी झाल्या आहेत.


अंजनगावचा सरपंच कोण होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून अंजनगावचे राजकारण नाट्यमय झाल्याचे चित्र दिसून येत होते.दोन्ही गटांनी विजय आपलाच,गुलाल आपलाच असे सांगितले होते.परंतु जनतेच्या मनात कोण? हे जनतेलाच माहित होते.3856 मतदारांपैकी 3296 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायतीच्या 13 सदस्य व जनतेतून सरपंच अशा 14 जागांसाठी ही निवडणूक लढवण्यात आली होती.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
आ.बबनदादा शिंदे प्रणित खेलोबा ग्रामविकास आघाडीचे उमेदवार
1) अरुणा प्रदीप चौगुले (सरपंच)
2)लटके शुक्राचार्य बिभीषण
3)गडेकर महादेव मारुती
4)वाघमोडे मनीषा बिरुदेव
5)माळी सुनीता भारत
6)रावडे अलका हिराचंद
7)वाघमोडे शिवाजी तुकाराम
8)चौगुले अनिता भागवत

आ.दादा- मामा ग्रामविकास ग्रामदैवत श्री खेलोबा प्रणित बहुजन आघाडीचे
उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत
1)इंगळे समाधान धोंडिबा
2)नाईक चंद्रकला विलास
3)देवकाते बालिका दादासाहेब
4)क्षीरसागर शोभा ज्ञानेश्वर
5)गायकवाड दशरथ सोमा
6) वाघमोडे बिभीषण विश्वनाथ

हेही वाचा – माढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचांनी दिला पदाचा राजीनामा; मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय

करमाळा तालुक्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने दिले जीवनशिक्षणाचे धडे; अधिकाऱ्यांनी केले कौतुक!

अंजनगावच्या नूतन महिला सरपंच अरुणा प्रदीप चौगुले व इतर विजयी उमेदवारांची मिरवणूक गुलालाची उधळण करत गावातून काढण्यात आली तसेच नूतन सरपंच अरुणा चौगुले व पती प्रदीप चौगुले यांनी जनतेची भेट घेत आभार व्यक्त करून अनेकांचे आशीर्वाद घेतले.गावातील अनेक ठिकाणी महिलांनी हार व फुल गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी नूतन सरपंचांनी नागरिकांना गावातील रखडलेली कामे करण्याचे आश्वासन दिले.

litsbros

Comment here