लग्नाला जाताना गाडीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या लग्नाला जात असताना गाडीचा अपघात होऊन सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. बीडच्या पेंडगाव जवळ हा भीषण अपघात झाला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं आहे.
नेवासाहून बीडला जात असताना पेंडगावजवळ घोसापुरी इथं कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चक्काचुर झाला आहे. पहाटे दोनच्या सुमारास गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले व एकजण गंभीरित्या जखमी झाला आहे. मृत्यू झालेल्यांची नावे धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कानगुने (वय 33) व जखमी आनंद वाघ (वय 28) राहणार सर्वजण नेवासा जिल्हा अहमदनगर येथील आहेत.
बीडला मित्राच्या लग्नाला येताना हा अपघात झाला. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडीने रोडवर तीन-चार पलट्या घेऊन रोडच्या बाजूला गाडी पलटी झाली यात गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. जखमींना बीड जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तात्काळ मदत करत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Comment here