माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

अंकुश डुचाळ विठ्ठलवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अंकुश डुचाळ विठ्ठलवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

माढा / प्रतिनिधी- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश सिद्धेश्वर डुचाळ यांची शाळेचे मुख्याध्यापक सुभाष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालक सभेत पुढील दोन वर्षांसाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नूतन अध्यक्ष अंकुश डुचाळ हे उच्च विद्याविभूषित असून स्पर्धा परीक्षेतून ते सध्या अनगर येथे सब पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी काही काळ पोस्टल बँकेत सहव्यवस्थापक म्हणून कामकाज पाहिले आहे. या नव्याने गठित केलेल्या समितीत उपाध्यक्ष गोपीनाथ मस्के,सदस्य विठ्ठल गाडे,युवराज शेगर,स्वाती काशीद,नितीन शिंगाडे,स्वाती सस्ते,अंबिका सोनवणे,शंकर उबाळे,रेखा खैरे,अश्विनी जाधव,रेश्मा बरकडे यांचा समावेश आहे.

यावेळी माजी अध्यक्षा रेणुका जाधव,शीतल गुंड, विजय काळे,भारत कदम,ऐजिनाथ उबाळे,गोरखनाथ शेगर,सुप्रिया ताकभाते,संजय सोनवणे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

या निवडीबद्दल त्यांचे पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,डॉ. किशोर गव्हाणे,चेअरमन अनिलकुमार अनभुले,उद्योजक विलास पारखे,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे,चेअरमन हनुमंत पाटील,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,डॉ.नेताजी कोकाटे,उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,नेताजी उबाळे,सौदागर गव्हाणे,धनाजी सस्ते,सुधीर गुंड,पोलीस पाटील बालाजी शेगर,गणेश नागटिळक,सतीश गुंड,कैलास सस्ते,दिनेश गुंड, सज्जन मुळे,समाधान कोकाटे, ब्रम्हदेव शिंगाडे,सुरेश शेगर, सौदागर खरात,भिवाजी जाधव, शिवाजी जाधव,दिनकर कदम, दत्तात्रय काशीद यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्याला कुकडी प्रकल्पाची 2 आवर्तने मिळणार; तिसरे आवर्तन मिळवण्यासाठीही आपण प्रयत्नशील; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती, वाचा सविस्तर

आई-वडील व गुरुंच्या संस्कारांच्या शिदोरीवर मुलांचे करिअर घडते – आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात व पशुधन विकास अधिकारी डॉ.ओंकार थोरात यांचा सत्कार

 सर्व सुज्ञ व जागरूक पालकांनी मला अध्यक्षपदी संधी दिली आहे.या पदाचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शालेय शिस्त निर्माण करण्यासाठी करणार आहे.शाळेत शिष्यवृत्ती,नवोदय विद्यालय परीक्षा,एटीएस, मंथन व इतर स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. पूर्वीप्रमाणे शाळेचा नावलौकिक तालुक्यात उंचावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष अंकुश डुचाळ यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी- नूतन अध्यक्ष अंकुश डुचाळ.

litsbros

Comment here