माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षेत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षेत यश

माढा प्रतिनिधी – माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालयाने एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दूर्बल घटक शिष्यवृती) २०२३-२४ परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयाचे तब्बल ४० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विविध स्पर्धा परीक्षेत विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख चढता आहे.

या एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. प्रणाली मोरे (१२३),सिद्धी शिंदे (११७),ऋतुजा शिंदे (११३),ऐश्वर्या शिंदे (११२),कोमल नागटिळक (१०६),रोहित नागटिळक (१०६), अक्षरी इंगळे (१०१),प्रमोद वाकडे (१००),नंदू पवार (१००),समीक्षा अर्जुन (९९),सार्थक सावंत (९९), मुक्ता माळी (९७),कृष्णा चौधरी (९७),पायल मोरे (९५),निरंजन वाकडे (९५),शिवानी डुचाळ (९०), निखिल सोनटक्के (८९),श्रुती सावंत (८८),तन्मय भोजरंगे (८८),सानिका भांगे (८६),स्वप्नाली शिंदे (८४),सिद्धार्थ कांबळे (८३),किरण व्यवहारे (८१),सारंग नकाते (८०),प्रथमेश नागटिळक (८०),प्रथमेश अष्टेकर (७९),सार्थक जाधव (७९),ओम हजारे (७८),ओम झाडबुके (७६),स्वरांजली बेडगे (७४),आदित्य पाटील (७३),ईश्वर देवकर (७३),आर्यन झाडबुके (७२),ओम बाबर (७२),कार्तिकी बाबर (७२),शरयू शेंडे (७२),श्रवण शेटे (७२),सानिका गोरे (७२),पूजा शितोळे (७१),वैष्णवी गायकवाड (७१) हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक श्री.बप्पासाहेब यादव सर, श्री. शब्बीर तांबोळी सर,श्रीम.सुनिता बिडवे मॅडम,श्री मकरंद रिकिबे सर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब यांचा स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य श्री भारत (आप्पा) घाडगे,स्कूल कमिटी सदस्य ॲड.श्री नानासाहेब शेंडे,उपळाई बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दिगंबर काळे साहेब,ज्येष्ठ शिक्षक श्री नागेश बोबे सर व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

करमाळ्याचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे शालेय स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन समिती,विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

litsbros