सोलापूर जिल्हा

चिमणी पाडकामा बाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी काढले अत्यंत चुकीचे आदेश – सोलापूर विकास मंच

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिमणी पाडकामा बाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी काढले अत्यंत चुकीचे आदेश – सोलापूर विकास मंच
_उच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल न करताच दिला फसवा आदेश

सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सोलापूररांना वेठीस धरुन तब्बल 4 महिन्यानंतर अत्यंत चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला आहे. श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशन प्लांट बाबत ४७८ अंतर्गत नोटीसीची सुनावणी घेऊन अनाधिकृत बेकायदेशीर ठरवून श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्यालाच ४५ दिवसांचा अवधी देऊन सोलापूरकरांची फार मोठी थट्टा केली आहे. सन 2017 साली हीच सर्व प्रक्रिया पार पाडुन देखील प्रशासन चिमणी पाडु शकली नाही.


त्या वेळी कारखाना अध्यक्षांनी सन 2017 चे गाळप संपल्यावर स्वतः हुन चिमणी पाडुन घेईन असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते.
व तात्कालिन जिल्हाधिकारी व आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी त्यावर विश्वास ठेवला. तीच चुक पुन्हा एकदा करुन करुन वर्तमान आयुक्त सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान करत आहेत.

भारत सरकार, महाराष्ट्र राज्य शासन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांची परवानगी आणि परवाने न घेता श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याचे को जनरेशन प्रकल्प गेल्या ०९ वर्षांपासून आज तागायात सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करुन सुरू आहे. सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना वेळोवेळी ह्या बाबत सर्तक करुनही जाणीवपूर्वक श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनचा बचावात्मक पवित्रा घेतला असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णया वर चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवारी सोलापूर विकास मंचची तातडीची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली असल्याचे विकास मंच सदस्यांनी सांगितले.

litsbros

Comment here