श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना मिळणार 12,48,000 रू शिष्यवृत्ती
माढा प्रतिनिधी – उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) 2024-25 परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयाचे 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नुकताच एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे.
विद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांची एन एम एम एस शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.विद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांना एन एम एम एस शिष्यवृत्ती अंतर्गत प्रती विद्यार्थी 48,000 रू प्रमाणे 96,000 रू मिळणार आहेत.एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे कु.काजल माळी, शंभूराजे मोरे आदी.तर सारथी शिष्यवृत्ती साठी विद्यालयाच्या 30 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत प्रति विद्यार्थी 38,400 रूपये प्रमाणे 11,52,000 रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सारथी शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे श्रवण मस्के, शिवराज कोरके,शिवतेज डोईफोडे, कु.प्रियांका लोंढे,तेजस बेडगे,रुद्र मटकर, कु.श्वेता डुचाळ,कु.साक्षी गोरे,कु.श्रावणी भांगे,प्रतापसिंह भांगे, ज्ञानेश्वर शिंदे,कु.प्रणवी जाधव,प्रेम कदम,ऋषिकेश भांगे,कु.ज्ञानेश्वरी डुचाळ,सुमित कदम,पृथ्वीराज भांगे,आदित्य माने,कु.देवकी काटे, कु.दिव्या डोईफोडे,कु.प्रगती कदम, आर्यन पाटील,कु.प्रगती गोरे,शुभम तिपे,कु.साक्षी शिवणे,समर्थ काळे, प्रथमेश गायकवाड,आर्यन कदम, ओम बेडगे,कु.प्रीती बाबर आदी.विद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांना एन एम एम एस शिष्यवृत्ती व 30 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती अशी एकूण 32 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.एन एम एम एस शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती अशी एकूण 12,48,000 रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक श्री बाप्पासाहेब यादव सर,श्री शब्बीर तांबोळी सर,श्री मकरंद रिकिबे सर,श्री केशव गायकवाड सर,श्री अविनाश नारनाळे सर,कु.ऐश्वर्या फडतरे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक तसेच मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब यांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री चंद्रकांत दळवी साहेब,रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा.डॉ.श्री अनिल पाटील साहेब,सचिव मा.श्री विकास देशमुख साहेब,विभागीय चेअरमन मा.श्री संजीव पाटील साहेब,सहसचिव मा.श्री बी.एन पवार साहेब,विभागीय अधिकारी मा.श्री एन.आर जगदाळे साहेब, उपविभागीय अधिकारी मा.श्री एन.टी निकम साहेब व मा.श्री डी.बी दाभाडे साहेब,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री सिताराम (बापू) गायकवाड,श्री भारत (आप्पा) घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे (वकीलसाहेब),शालेय व्यवस्थापन समिती,विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.