उंदरगावच्या बिनविरोध सरपंचांनी दिवाळी किट वाटप करून गरिबांची दिवाळी केली गोड
केतूर ( अभय माने) :- करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायत पैकी उंदरगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. निवडणुकी मध्ये वायफळ खर्च न करता बिनविरोध निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच श्री.युवराज विक्रम मगर यांचे मार्फत प्रत्येकी 1 हजार 500 रूपये किंमतीचे पंच्चावन 55 गोरगरीब नागरिकांना दिपावली किट वाटप करण्यात आले. यामध्ये साखर,हरभरा डाळ,तेल,रवा,मैदा,खरीक खोबरे,गुलाब जामुन,साबण या वस्तुंचा प्रामुख्याने समावेश होता.
यावेळी गोरगरीबांच्या अशीर्वादाने व आनंदात दिपावली साजरी करण्यात आली.
यावेळी मकाईचे संचालक श्री.रेवन्नाथ निकत श्री.रघुनाथ निकत, पोलीस पाटील श्री.विजय निकत ग्रा.सदस्य,श्री.रामहारी गरदडे,श्री शिवाजी कोकरे,श्री.ऋषिकेश मगर,श्री.तात्यासाहेब कोकरे,श्री.दादा मगर,श्री.नवनाथ मोरे,श्री.विरेंद्र मगर,
हेही वाचा – केतूरच्या सरपंचपदी सचिन वेळेकर तर ‘हे’ आहेत इतर विजयी उमेदवार; क्लिक करून वाचा केत्तूर
श्री.साहेबराव मगर,श्री.महेश कोकरे, श्री.भारत मगर, श्री.सचिन जावळे, श्री.योगेश ताकमोगे,श्री. श्री.संतोष मगर, श्री.लक्ष्मण पाटील,श्री. गणेश जावळे,श्री. हनुमंत निकत,श्री.सागर कुंभार,श्री.दादा लोकरे यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते
Comment here