करमाळासोलापूर जिल्हा

उमरड येथे भिमजयंती उत्साहात साजरी; चार दिवस विविध कार्यक्रमातून अभिवादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड येथे भिमजयंती उत्साहात साजरी; चार दिवस विविध कार्यक्रमातून अभिवादन

उमरड(प्रतिनिधी); करमाळा विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उमरड येथे सलग चार दिवस कार्यक्रम आयोजित केले होते बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली “जागर माहामानवांचा” या कार्यक्रमांसह संपुर्ण जयंती उत्सवाचे नियोजन केले होते.

दिनांक 11एप्रील रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम सादर केला होता,दिनांक 12 एप्रील रोजी प्रा.संपत गारगोटे सर मुंबई यांचे छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणी राजश्री शाहूमहाराज यांच्या विचारान वरती प्रकाश टाकणारे जबरदस्त व्याख्यान झाले व्याख्यानाचा परीणाम दलित, मुस्लिम,हिंदु समाजा मध्ये एक मेका बद्दल प्रेम निर्माण करणारा होता.

दिनांक 13 एप्रील रोजी प्रा.डाॅ. संजय चौधरी सर यांचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व संत तुकाराम महाराज यांचे विचार कसे समता वादी होते हे त्यांच्या प्रभावी वकृत्व शैलीने व पोवाड्याच्या माध्यमातून सांगीतले स्त्रोते चौधरी सरांच्या भाषणाने मंत्रमुग्ध झाले.

प्रा.नंदकिशोर वलटे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशातील जातीयवाद संपुन एससी, एसटी, ओबीसी, व ओपन वर्ग एकत्र येत आहे हे पटवून दिले.

दिनांक 14 एप्रील फोजमल पाखरे गुरुजींचे व्याख्यान झाले संवीधानामुळे सर्व समाजातील लोकांना न्याय मिळतो संविधानाचे रक्षण करणे बहुजन समाजाची जबाबदारी आहे असे सांगितले.विशेष चार दिवस गावात मुख्य रस्त्यावर आकर्षक लाईटींगच्या सुंदर रोषणाई मुळे गावात झगमगाट दिसत होता.

दिनांक 14 एप्रील रोजी सकाळी
09 -00 वा. विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सर्व बौद्ध समाज व ग्रामस्थांच्या उपस्थित बुद्ध वंदना घेऊन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, सरपंच बापू पडवळे,सरपंच संदीप मारकड, पोलीस पाटील आंकुश कोठावळे ,सरपंच बापु चोरमले,उपसरपंच गणेश चौधरी,विकास सोसायटी चे चेअरमन दत्तात्रय बदे, मेजर देवीदास पाखरे प्रा.नंदकिशोर वलटे, फोजमल पाखरे गुरुजी, दादासाहेब खंडाळे, श्रीमान चौधरी, जनार्धन मारकड, बालाजी मारकड, श्रीकांत मारकड, ग्रामपंचायत सदस्य भागवत कदम या सर्वांनी पुष्पहार घातला.दि.14 एप्रील सायंकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली.

मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजाच्या लोकांनी विषेश स्त्रियांनी सुध्दा बँजोच्या तालावर ठेका धरला मिरवणुकीत मोठी गर्दी उसळली होती. सर्व समाजाला मेजर दासा पाखरे यांनी आंन्नदान केले.

हेही वाचा – हिंगणी येथील विविध कार्यकारी सेवा संघाच्या निवडणुकीत जगताप शिंदे गटांची बाजी; पाटील गटाचा पराभव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड

आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष,सदस्य रूशी शिंदे,कैलास कदम, लखन कदम, विकास कदम, राजेंद्र शिंदे,सदा कदम, आबा कदम, राजू कदम,महिंद्र कांबळे, आमोल भोसले, उत्तरेश्र्वर कदम, लक्ष्मण दत्तू कदम, लक्ष्मण शिंदे, आजीनाथ भोसले, दादा कदम,सागर कदम, राजेश कदम, दासा गायकवाड, भिवा कदम, भीमराज कदम , सूर्यकांत कदम,पप्पू कदम, वैजनाथ कदम या सर्वांनी जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

litsbros

Comment here