सोलापूर जिल्हा

उजनी पांण क्षेत्रामध्ये दाट धुक्याची चादर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी पांण क्षेत्रामध्ये दाट धुक्याची चादर

केत्तूर (अभय माने):  करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात उजनी लावक्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसापासून पहाटेच्या वेळी दाट धुके पडू लागले आहे . अरबी समुद्र तयार झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरण तयार होत आहे काही ठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकावाही झाला होता त्यामुळे ऐन (थंडीच्या दिवसात )हिवाळ्यात पावसाळ्याचा प्रत्येय नागरिक घेत आहेत.

वातावरणात सतत बदल होत असल्याने शेती पिकावर तसेच फळबागावर मोठा परिणाम होत आहे. उभी पिके तसेच फळबागावर रोगाची संकट वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.आंब्याचा मोहरही या वातावरणामुळे गळु लागला आहे.

गुलाबी थंडी आणि दाट धुके अशा मनमोहक वातावरणा चाचा अनुभव उजनी परिसरातील नागरिक सध्या घेत आहेत.तरबदलत्या वातावरणामुळे नागरिक सर्दी पडशानी हैराण झाले आहेत तर दार धूक्यामुळे पहाटे वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे..तालुक्यातून जाणारी रेल्वे सेवा ही या दाट धुक्यामुळे करमाळा तालुक्यातील धावणाऱ्या रेल्वे गाड्या भीम्या गतीने सुरू असून हॉर्न वाजवीत रेल्वे धावत आहेत तर मच्छीमारांना पाण्यात उतरताना अडचणी येत आहेत.

litsbros

Comment here