करमाळा तालुक्यावर वरुणराजा रुसला; शेतकरी चिंतेत, पावसाची प्रतिक्षा
केत्तूर (अभय माने) राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले असले तरी करमाळा तालुक्यावर मात्र वरून राजा रुसला आहे किंवा तो गुंगारा देत आहे.मागील काही दिवसापासून केवळ रिमझिम पाऊस हजेरी लावून चिखल करीत आहे जून पूर्णपणे कोरडा गेला जुलैमध्ये दमदार पाऊस होईल अशी आशा होती परंतु येथेही रिमझिम पाऊसच होत असल्याने निराशा झाली आहे.
आकाशात ढग जमा होत आहेत परंतु बरसात मात्र होत नाही त्यामुळे चिंता वाढली आहे उजनी धरण साठ्यातही हळूहळू वाढ होत आहे धरण अजूनही मायनस मधून बाहेर पडले नाही ही चिंतेची बाब आहे.
करमाळा तालुक्याच्या जीरा येथील भागातील नाले तलाव अद्यापही कोरडे पडलेले आहेत.पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी तालुक्यात मुसळधार दमदार पाऊस झाला नाही.
सद्यस्थितीत झालेल्या पावसाने शिरवळ मात्र दिसत असली तरी तिची तहान मात्र भागली नाही परिणामी उचकी मारू लागले आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान मंगळवार (ता.25) रोजी तालुक्याच्या केत्तूर व कंदर क परिसरात मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला या पावसाने सखल भागात पाणी वाहिले तर काही ठिकाणी पाणी साचले होते.
परिसरात चिखलाचे साम्राज्य मात्र निर्माण झाले होते.त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती .
Add Comment