माढा शैक्षणिक सोलापूर जिल्हा

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना मिळणार 9,60,000 रू शिष्यवृत्ती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना मिळणार 9,60,000 रू शिष्यवृत्ती.

सोलापूर प्रतिनिधी
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) 2023-24 परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयाचे 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नुकताच एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे.

विद्यालयाच्या 04 विद्यार्थ्यांची एन एम एम एस शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.विद्यालयाच्या 4 विद्यार्थ्यांना एन एम एम एस शिष्यवृत्ती अंतर्गत प्रती विद्यार्थी 48,000 रू प्रमाणे 1,92,000 रू मिळणार आहेत.एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रणाली मोरे,ऋतुजा शिंदे,ऐश्वर्या शिंदे,नंदू पवार आदी.तर सारथी शिष्यवृत्ती साठी विद्यालयाच्या 20 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत प्रति विद्यार्थी 38,400 रूपये प्रमाणे 7,68,000 रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.

सारथी शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे सिद्धी शिंदे,कोमल नागटिळक,रोहित नागटिळक,अक्षरी इंगळे,सार्थक सावंत,कृष्णा चौधरी,पायल मोरे,शिवानी डुचाळ,श्रुती सावंत,सानिका भांगे,किरण व्यवहारे,प्रथमेश नागटिळक,सार्थक जाधव, स्वरांजली बेडगे,आदित्य पाटील,ओम बाबर,कार्तिकी बाबर,सानिका गोरे,कु.पूजा शितोळे,वैष्णवी गायकवाड आदी.विद्यालयाच्या 4 विद्यार्थ्यांना एन एम एम एस शिष्यवृत्ती व 20 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती अशी एकूण 24 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.एन एम एम एस शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती अशी एकूण 9,60,000 रू शिष्यवृत्तीमिळणार आहे.

हेही वाचा – जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,, वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक बप्पासाहेब यादव सर, शब्बीर तांबोळी सर,सुनिता बिडवे मॅडम, मकरंद रिकिबे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब यांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब,रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब,सचिव विकास देशमुख साहेब,विभागीय चेअरमन संजीव पाटील साहेब,सहसचिव बी.एन पवार साहेब,विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे साहेब, उपविभागीय अधिकारी दाभाडे साहेब निकम साहेब,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सिताराम (बापू) गायकवाड, भारत (आप्पा) घाडगे,ॲड. नानासाहेब शेंडे (वकिलसाहेब),शालेय व्यवस्थापन समिती,विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!