क्रीडामाढासोलापूर जिल्हा

श्री नंदिकेश्वर विद्यालयाची क्रीडा स्पर्धेत यशाची परंपरा कायम;26 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री नंदिकेश्वर विद्यालयाची क्रीडा स्पर्धेत यशाची परंपरा कायम;26 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

माढा प्रतिनिधी
माढा येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले.विद्यालयाच्या 26 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

यामध्ये 14 वर्षे मुलांच्या धावणे स्पर्धेत समर्थ माळी 100 मीटर द्वितीय व 200 मीटर द्वितीय,80 मीटर हर्डल्स द्वितीय,अनिश खताळ 200 मीटर धावणे तृतीय, तेजस बेडगे 400 मीटर द्वितीय, 600 मीटर तृतीय, संस्कार बेडगे 600 मीटर द्वितीय यांनी उज्वल यश संपादन केले.4×100 मीटर रिले स्पर्धेत 14 वर्षे मुलांचा संघ तालुक्यात प्रथम आला.

यामध्ये समर्थ माळी,अनिश खताळ,विवेक लोंढे,वीर आष्टेकर व समर्थ बरबडे यांनी यश संपादन केले.14 वर्षे मुलींच्या धावणे स्पर्धेत राजनंदिनी वागज 100 मीटर प्रथम व 200 मीटर प्रथम,साक्षी काळे 100 मिटर तृतीय,200 मीटर द्वितीय व 80 मीटर हर्डल्स तृतीय, ऐश्वर्या शिंदे 400 मीटर प्रथम, मैथिली थोरात 400 मीटर धावणे द्वितीय,स्वप्नाली देशमुख 600 मीटर प्रथम,साक्षी गोरे 600 मीटर द्वितीय यांनी यश संपादन केले.

17 वर्षे मुलांच्या वयोगटात रोहन मोरे 200 मीटर तृतीय,प्रसाद डुचाळ 400 मीटर द्वितीय व 800 मीटर द्वितीय,शिवरत्न कन्हेरे 800 मीटर प्रथम,शिवराज इंगळे 400 मीटर हर्डल्स प्रथम,400 मीटर धावणे तृतीय यांनी यश मिळवले.4×400 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलांचा संघ तालुक्यात प्रथम आला.यामध्ये प्रसाद डुचाळ, शिवराज इंगळे, संजोतराजे कोळेकर,यशराज देशमुख व गणेश देशमुख यांनी उज्वल यश संपादन केले. तसेच 4×100 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलांचा संघ तालुक्यात तृतीय आला.यामध्ये रोहन मोरे,प्रसाद डुचाळ,सुजित वाघमारे,हर्षद हत्ताळे व सिद्धराज पाटील यांनी यश मिळविले.

17 वर्षे मुलींच्या धावणे स्पर्धेत काजल पवार 100 मीटर द्वितीय,400 मीटर प्रथम,100 मीटर अडथळा द्वितीय,धनश्री खडके 200 मीटर प्रथम,साक्षी राऊत 400 मीटर धावणे द्वितीय व 800 मीटर धावणे प्रथम,गौरी निकम 800 मीटर धावणे द्वितीय,अपूर्वा शेटे 400 मीटर हर्डल्स प्रथम,अनुष्का गुंड 200 मीटर धावणे तृतीय यांनी यश संपादन केले.4×400 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला.यामध्ये साक्षी राऊत, काजल पवार,वैष्णवी डुचाळ,अपूर्वा शेटे व अनुष्का गुंड यांनी उज्वल यश संपादन केले.

हेही वाचा – आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न;55 रक्तदात्यांनी केले रक्तदान

राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक शब्बीर तांबोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचा स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य कृष्णा (आप्पा) घाडगे,ॲड. नानासाहेब शेंडे (वकिलसाहेब) व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.तसेच मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब,उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच मनोहर (आबा) गायकवाड, अजितसिंह देशमुख साहेब,सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी लोंढे सर व रामचंद्र माळी सर,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here