करमाळाकेमसोलापूर जिल्हा

सातोलि येथे गुणवंतांचा कौतुक सोहळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सातोलि येथे गुणवंतांचा कौतुक सोहळा संपन्न

केम प्रतिनिधी संजय जाधव –
करमाळा तालुक्यातील सातोली येथील संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय वतीने विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या मध्ये
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालेला अक्षय बंडू भोगे याचा सत्कार सातोली चे सरपंच श्री मनोहर कदम यांच्या हस्ते झाला तर भारतीय नौदला मध्ये निवड झालेला रणजीत रमेश फरतडे यांचा सत्कार सातोली चे उपसरपंच भास्कर खूपसे यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच भारत फोर्स कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या ऋषिकेश भाऊसाहेब मैंदड , शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविलेला प्रशांत रोहिदास मुटेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष लोकसेवक बबनराव साळुंके हे होते.यावेळी वाचनालयाच्या संचालक पदी उपसरपंच भास्कर खुपसे व विठ्ठल फरतडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी सातोली गावचे सरपंच मनोहर कदम,उपसरपंच भास्कर खूपसे, माजी कृषी अधिकारी दिगंबर साळुंके,वाचनालयाचे उपाध्यक्ष भास्कर साळुंके,संचालक विठ्ठल फरतडे, मजी सरपंच विलास चव्हाण,बंडू भोगे,माजी सरपंच रोहिदास मुटेकर,भाऊसाहेब मैंदड,नागनाथ चव्हाण,नितीन साळुंके,गणेश भोगे, दिपक फरतडे,बापू जगताप,गणेश चव्हाण,सर्जेराव फरतडे,नागनाथ फरतडे, किसन बापू साळुंके, गणपत चव्हाण,भीकुदास साळुंके,हरिदास चव्हाण,कालिदास साळुंके, सतिश भोगे,आजिनाथ फरतडे,रमेश फरतडे, शांतीलाल साळुंके, चंद्रकांत फरतडे, बालाजी साळुंके, दिपक गावडे, रोहिदास साळुंके,भारत फरतडे, सुनील वाघ अमित खूपसे ,अनिल साळुंके,किशोर साळुंके,रमेश कोडलिंगे आदी उपस्थित होते.


यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक रमेश फरतडे ,दिपक फरतडे, अमित खुपसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजक वैद्य हरिश्चंद्र बबनराव साळुंके (संस्थापक,सद्गुरू आरोग्य धाम, सातोली) यांनी प्रास्ताविक करून यशस्वी विद्यार्थ्यांचा जीवन परिचय करून दिला. पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन वाचनालयाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.

हेही वाचा – रेल्वेने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात पूर्वी प्रमाणे सुट द्यावी; ॲड विघ्ने यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

केम येथे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; हजारोंच्या बक्षिसांची खैरात

वाचनालयामध्ये पाच हजार पुस्तक असून विविध स्पर्धा परीक्षांची मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध आहेत.या पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी,महिलांनी,ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.वाचनालयाचे ग्रंथपाल कवी सोमनाथ टकले यांनी आभार मानले.विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रम पार पडला.

litsbros

Comment here