संजय गांधी निराधार योजनेतील अनुदानात वाढ; किती झाली वाढ? वाचा क्लिक करून सविस्तर
करमाळा(प्रतिनिधी); महाराष्ट्र राज्य सरकार ने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून 1500/-रुपये केले असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे माजी अध्यक्ष तथा करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजी बंडगर यानी दिली.
या बाबत बोलताना बंडगर म्हणाले की, गेली अनेक वर्षे सं गा निराधार योजनेंतर्गत लाभ घेणार्या गोर गरीब, निराधार, विधवा , परीतक्ता महिला,व्रद्ध आदि ना रूपये दरमहा 1000/- इतके मिळत आहे. या अनुदानात वाढ करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. आपण अध्यक्ष असताना आम्ही ही अनेकदा सरकार कडे केली होती.
याचा सारासार विचार करून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बाबत निर्णय केला होता. परंतु अध्याप अंमलबजावणी केलेली नव्हती . काल दिनांक 5 जुलै रोजी अंमलबजावणी बाबत चा शासनादेश जारी केला असून जुलै 2023 पासून याची सुरूवात करण्यात येणार आहे.
बंडगर पुढे म्हणाले की , संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत येणार्या सर्व योजना म्हणजे सं गा योजना , ईंदिरा गांधी विधवा निव्रत्ती वेतन योजना , श्रावण बाळ निव्रत्ती वेतन योजना , इदिरा गांधी राष्ट्रीय निव्रत्ती वेतन योजना आदि सर्व योजना साठी देखील ही 500 रुपयाची वाढ आहे .
करमाळयात आरोग्य मंत्री प्रा.तानाजीराव सावंत सांगतील तोच आमदार होणार; कुणी केला दावा? वाचा सविस्तर
करमाळा तालुक्यातील सुमारे नऊ हजार लाभार्थ्याना याचा लाभ होणार असून तालुक्यात दरमहा आता पूर्वीपेक्षा साडचार लाख रुपये जादा येणार आहेत.
या वाढी मुळे सं गा योजनेतील लाभार्थ्यां मधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Add Comment