करमाळा

सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी
दि.३० एप्रिल २०२४ रोजी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने करमाळा तालुक्यातील सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सालसे येथील उद्योगपती दशरथ शेठ घाडगे, रिपाई चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेशदादा कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओहोळ,पंचायत समिती माजी सदस्य सुनिल लोखंडे,सरपंच सतिश ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार सर,संभाजी गोसावी सर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी नागेशदादा कांबळे यांनी तरुणांनी बाबासाहेबांचे कार्य पुढे न्यायचा उपदेश केला.तर सुभाष ओहोळ यांनी सर्वांनी आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान द्यावे असे सांगितले. दिपक ओहोळ सर यांनी बाबासाहेबांचा विद्यार्थ्यांप्रती असणारा संदेश आपल्या भाषणात सांगितला.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

व्यवहारात दहा रुपयांच्या नोटा गायब तर नाण्यांचा खळखळाट!

यावेळी स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारे स्वरा दिपक ओहोळ,शुभांगी कैलास शिंदे व सिद्धी सचिन ओहोळ यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व बक्षीस देऊन करण्यात आले.
यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथामध्ये मिरवणूक मोठ्या जल्लोषात गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली.यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष,महिला व लहान मुले सामील झाली होती.त्यामध्ये सर्व लहान- मोठ्यांनी भिमगीतावर ठेका धरला.शेवटी अन्नभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

litsbros