करमाळा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी


करमाळा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी

करमाळा (प्रतिनिधी – अलीम शेख); राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्तविद्यमाने हजरत मुहम्मद पैगंबर साहेब जयंती अर्थात ईद ए मिलाद करमाळा येथील मदरसा ए फैजुल कुरआन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मदरशातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ व बक्षीस वाटप करण्यात आले.

यावेळी मदरशाचे कारी इस्माईल शेख, मौलाना सय्यदअली मुजावर, मौलाना सिकंदर मुलाणी, हाफिज कादिर शेख, आर. आर. पाटील, इसाक पठाण यांनी आपले विचार मांडले.

यावेळी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कय्युम शेख, मैनुद्दीन शेख, बशीर शेख, शहनवाज कुरेशी, सोयेब कुरेशी, अमीर मोमीन, तौसिफ मुलाणी, जैद शेख यांच्यासह बामसेफ राज्यकार्यकारणी सदस्य अरुण माने, तालुका अध्यक्ष गंगाराम भोसले,

हेही वाचा – करमाळा बाजार समिती अखेर बिनविरोध; जगताप गटाच्या हाती सत्ता; क्लिक करून वाचा नव्या संचालकांची नावे

करमाळा शहरातील केके लाईफस्टाईल मध्ये रोजगाराची संधी; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, दिनेश दळवी, भीमराव कांबळे, दिनेश माने, मधुकर मिसाळ, दीपक भोसले, रावसाहेब जाधव, विनोद हरिहर, बाबुराव पाटील, रामजी कांबळे, अद्वैत माने आदीजण उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line