*रमजान ईद च्या निमित्ताने कुंभेज मधे दिसून येतेय सामाजिक ऐक्य.*
– दिग्विजय बागल
केत्तूर (अभय माने) कुंभेज ( ता.करमाळा) येथील ज्योतिर्लिंग मंदिरात आयोजित शिरखुर्मा मेजवानी प्रसंगी अनौपचारिक संवाद साधताना दिग्विजय बागल म्हणाले की स्व. लोकनेते दिगंबरराव बागल हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असताना वंचित व अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवण्यास त्यांनी कायम प्राधान्य दिले. हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनुभव हाच समतेचा विचार बागल कुटुंबीय आजही जपत आहे.
कुंभेजच्या पठाण, शेख कुटुंबीयांकडून साजरी केली जाणारी ईद ही आगळी वेगळी असून सर्व समूदायाना सोबत घेऊन आनंद साजरा केला जात आहे यातून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जात आहे हे कौतुकास्पद असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सर्व धर्मीय मित्रपरिवार मंदिरात शिरखुर्म्याचा आनंद घेतात हे अनोखे उदाहरण असल्याचे बागल म्हणाले.
कुंभेज येथील पैगंबर पठाण, अमीन पठाण आणि आदम मकबूल शेख परिवार मागिल पाच वर्षांपासून ज्योतिर्लिंग मंदिरात सार्वजनिक स्वरूपात रमजान ईद आणि शिरखुर्म्याचा आनंद सर्वधर्मीयांसोबत एकत्र येऊन साजरा करत आहेत . याप्रसंगी पठाण कुटुंबियांकडून शिवसेना नेते दिग्विजय बागल यांना सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – मेजर अक्रुर शिंदे यांना अँन्टी करप्शन बोर्ड दिल्लीचा महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार.
जिनियस अबॅकस क्लास जेऊरच्या गुणवंतांचा सत्कार
यावेळी कुंभेजचे मा. सरपंच गोकुळ शिंदे, बाबा शिंदे, सुरेश शिंदे, कल्याणराव साळुंके, महादेव शिंदे, राजेंद्र शिंदे. संतोष शिंदे, दिलीप पवळ,अशोक पवळ, बलभीम पवळ, शंकर वाघमारे , पैगंबर पठाण, अमीन पठाण, आदम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल चौगुले, दादा जाधव, आश्रु तोरमल, किसन शिंदे, किशोर कदम, संतोष घोरपडे, सचिन शिंदे, तानाजी चांदणे, रविंद्र पवळ, . सोमनाथ पवळ तसेच कुंभेज मधील बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.