पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य. प्रदेश उपाध्यक्ष पदी ” नमिता थिटे” यांची पुनश्च एकदा निवड
केत्तूर ( अभय माने) पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक मा.रविभाऊ वैद्य, प्रदेश संघटक माणिक भाऊ निमसे, प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर यांच्या आदेशानुसार महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाणे यांनी नमिता थिटे यांची पुनश्च एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली.
नमिता थिटे यांनी यापूर्वी महिला दिनानिमित्त पोलिस अधिकारी .S.P., D.C.P. , A.C.P., P.I., A.P.I. P.S.l. Police या सर्व महिला पदाधिकारी यांचा ” करोना योध्दा
म्हणून सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. करोना काळात भाजी मंडई मध्ये भाजी विक्रेते यांना सॅनिटर व मास्क वाटप केले होते, संक्रांतीच्या वेळी वाण म्हणून मस्क वाटप केले होते. मोफत आरोग्य तपासणी, तसेच पोलीस कूटुंबियांसाठी व पत्रकार कुटुंबियांन साठी गौरी गणपती आरास स्पर्धा, गुणवंत पोलीस पाल्यांचा सत्कार, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रातील एकमेव रजिस्टर संस्था आहे. रविभाऊ यांचे वडील पोलिस होते. त्यामुळे रविभाऊंनी पोलिसांची व त्यांच्या कुटुंबियांची समस्या जवळून पाहिले होते. पोलीस कुटुंबियांसाठी कही तरी केले पाहिजे या तळमळीने रविभाऊ यांनी 2011 साली पोलिस बॉईज असोसिएशनची रजिस्ट्रेशन करून स्थापना केली.2013 साली माजी गृहमंत्री मा. R.R. पाटील यांच्या माध्यमातून पोलिस पाल्यांसाठी पोलिस भरती मध्ये 5/ टक्के आरक्षण मिळाले. व पोलिस ट्रेनिंग मध्ये 1600 मीटर रनिंग मध्ये 50 सेकंद सर्वांसाठी वाढवून मिळाले .
पोलीस पाल्यांसाठी विविध खेळ, शिक्षण, वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत आहे. पोलीसांचा पगार, त्यांची ड्युटीची वेळ, आरोग्य, न्याय व पोलीस भरतीमध्ये वाढवून मिळावेत म्हणून व पोलीसांच्या हक्कासाठी कायम पोलिस बॉईज असोसिएशन कार्यरत आहे. असोसिएशनचे काम पाहून गृहमंत्री R.R.पाटील यांनी कौतुक केले.
हेही वाचा – केत्तूर परिसरातील नागरिकांनी घेतला ” छावा ” या ऐतिहासिक चित्रपटाचा आनंद
करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके
नमिता थिटे यांचे सासरे पण पोलिस दलात कार्यरत होते. नमिता थिटे यांनाही पोलिसांची समस्या माहिती आहे. यापुढेही मी असोसिएशन माध्यमातून न्याय व हक्कासाठी कार्य करीत जाईन. तसेच लवकरच सोलापूर शहर – जिल्हा अध्यक्ष, डॉक्टर सेल, विधी आघाडी, युवती आघाडी, शिक्षक आघाडी, व मिडीया प्रमुख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नमिता थिटे यांची पुनश्च एकदा निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रांतून कौतुक होत आहे.