उजनी जलाशयावरील गोयेगाव-आगोती पुल उभा करणे साठी नारायण आबा पाटील यांना पाठींबा -गोरखनाथ पवार
केत्तुर प्रतीनिधी:-
करमाळा तालुक्यातील सर्वांना मध्यवर्ती असलेल्या उजनी जलाशयावरील गोयेगाव ता.करमाळा ते आगोती ता इंदापूर या ठिकाणी उजनी जलाशयावरील पुल उभारणी साठी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांनी शब्द दिला आहे.
वाशिंबे येथील प्रचारसभेत या पुला साठी प्रयत्न करणारे लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे गटातुन नारायण आबा पाटील गटात प्रवेश केला.
त्यावेळे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी गोयेगाव पुल उभारणी चा शब्द दिला आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील यांचा विजय निश्चित असुन नारायण आबा पाटील हे शब्दाचे पक्के आहेत.या अगोदर त्यांनी केत्तुर नं 1 ते केत्तुर नं 2 आणि केत्तुर नं 2 ते पोमलवाडी हे उजनी जलाशयावरील पुल उभारले आहे.तसेच टाकळी ते सावडी आणि कुंभेजफाटा ते करपडी फाटा असे कोट्यवधी रुपयांची कामे त्यांनी केली आहे.तसेच दहीगाव उपसा सिंचन योजना सुरू केली आहे.
महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी
आम्हाला खात्री आहे की ते गोयेगाव-आगोती पुल उभारणी साठी शासनदरबारी पाठपुरावा करून हा पुल मंजूर करून आणतील.असा विश्वास गोरखनाथ पवार यांनी व्यक्त केला.मुख्खमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात गोयेगाव -आगोती पुला साठी आम्ही प्रयत्न केले परंतु बजेट प्लेट मध्ये असलेल्या हे काम विद्यमान लोकप्रतिनिधींनी जाणूनबुजून प्रयत्न करून रद्द करण्याचे पाप केले आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील हे नक्की विजयी होतील असे पवार यांनी सांगितले.