पांडे येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
करमाळा प्रतिनिधी – पांडे येथे भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश(भाऊ) चिवटे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर झाली होती.यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय ते मज्जीत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे व ग्रामपंचायत कार्यालय ते सावता माळी मंदिर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या आठ लाख रुपये निधीच्या विकास कामांचे भूमिपूज चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण करमाळा तालुक्याच्या विकासकामासाठी अनेक गावांमध्ये विविध विकासकामांना निधी मंजूर केला आहे,सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पांडे गावासाठी 25 ते 30 लाख रुपये निधी मंजूर केला आहे,यापैकी दोन कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.
यापुढेही येणाऱ्या काळात पांडे गावासाठी व तालुक्याच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले व 16 फेब्रुवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात पांडे गावातील व परिसरातील विवाह सोहळे सामुदायिक विवाह सोहळ्यात आयोजित करावे अशी विनंती चिवटे यांनी ग्रामस्थांना केली.
यावेळी बिटगावचे सरपंच डॉ अभिजीत मुरूमकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे, सरचिटणीस नितीन झिंझाडे, पांडे गावचे सरपंच बाळासाहेब अनारसे, ग्रामपंचायत सदस्य संदिपान दुधे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोसले, कल्याण (आप्पा) दुधे,
हेही वाचा – गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश
जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांचा आदर्श गाव पाटोदा ला अभ्यास दौरा
दशरथ कुंभार ,इनुस मुजावर , पप्पू (नाना) अनारसे ,गहिनीनाथ दुधे( माजी उपसरपंच) , गजेंद्र वीर (गुरुजी) , उपसरपंच नितीन निकम, नाना अनारसे, पत्रकार दस्तगीर मुजावर ,पत्रकार सुनील भोसले, पत्रकार संजय तेली,अजित दुधे, रघुनाथ दुधे, सतीश अनारसे, सिकंदर तांबोळी, राजेंद्र गोसावी,प्रल्हाद मेंढापुरे, अंकुश विटकर, मुरलीधर क्षीरसागर, एकनाथ कोल्हे, ललित माने, ब्रह्मदेव दुबे, संदीप दुधे,शब्बीर मुलानी, रमेश दुधे, अण्णा गोसावी, उत्तम कुंभार, महेश महामुनी, आकाश आंधळकर, सिद्धनाथ घोरपडे, जुबेर मुलानी, मनोज वीर,अण्णा भोसले, रवी लांडगे, रामदास भोसले, दत्तात्रय दुधे, प्रदीप शिरसागर, रमेश भोसले, दादा भोसले, बुद्धम भोसले, ऋषिकेश मेंढापुरे, दत्तात्रय पवार, सतीश वीर, अमोल वीर, अंगद वीर, गणेश भोसले, बापू क्षीरसागर, परशुराम दुधे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,