नातीवर अत्याचार करणा-या त्या क्रूर आजोबाला कोर्टाने सुनावली सात दिवसांची पोलिस कोठडी
जेऊर (प्रतिनिधी) ;
करमाळ्यातील घृणास्पद व नात्याला काळीमा फासणा-या घटनेतील ६४ वर्षीय नराधमास बार्शी सेशन कोर्टातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल एस चव्हाण यांनी ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आपल्या अल्पवयीन चुलत नातीशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून तिला गर्भवती करण्याचा प्रकार या वृध्द आजोबांनेच केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
यामध्ये करमाळा पोलिसांनी तातडीने दखल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेला संशयित आरोपींस अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या होत्या. संबंधित संशयित आरोपीला जेरबंद केलेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन नात्याला काळीमा फासणा-याला कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे..
याबाबतची हकीकत अशी की, तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावातील एका १३ वर्षीय अल्पवयीन निर्भयास या आजोबाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या वेळी ती घरात एकटी असल्याचे पाहुन घरात प्रवेश करून तिच्यासोबत जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी ही दिली होती . या घटनेनंतर या आजोबांनी पुन्हा पुन्हा अनेक वेळा या नातीवर जबरदस्तीने अत्याचार केला.
वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून मारहाण प्रकरण; कुंभारगाव येथील त्या आरोपींचा जामीन नामंजूर
दरम्यान या मुलीचे पोटात दुखत असल्याने व तिला वेगळी लक्षणे आढळल्याने या मुलीने आजोबाने हा प्रकार जबरदस्तीने केल्याचे आईला सांगितले. यावेळी पिडित मुलीच्या आईने पिडित मुलगी व पतीसह जाऊन पोलिसात फिर्याद दिली.
हा प्रकार साधारण मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घडला होता. यावेळी आई- वडील मजुरी करण्यास गेल्याचा गैरफायदा या आजोबाने घेऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला .
याची फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, हवालदार संतोष देवकर, मेजर आनंद पवार यांनी पळून जाणा-या आजोबांला बेड्या ठोकल्या व या गुन्हेगारावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून बार्शी सत्र न्यायालयातील सत्र न्यायाधीश श्री चव्हाण यांच्या समोर उभे केले.
तेव्हा त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान या घृणास्पद गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे पुढील तपास करीत आहेत.
Add Comment