मांजरगाव येथे महिला दिन साजरा

मांजरगाव येथे महिला दिन साजरा

केत्तूर ( अभय माने) संपूर्ण महिला राज असणारी मांजरगाव ग्रामपंचायत मधील जय हनुमान बालक विद्यामंदिर शाळेमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. सारिका दोभाडा यांनी मार्गदर्शन करताना महिलांना निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार ,व्यायाम तसेच आजार बळावू नये यासाठी वेळेत उपचार याचे महत्त्व समजावून सांगितले. महिलांमधील वाढत्या मानसिक विकारांसाठी उपाय म्हणून विविध महिला गट /बचतगट यामध्ये सामील व्हावे किंवा एखादा छंद जोपासावा असे आवाहन केले.

यावेळी लहान मुलांना संबोधन करताना डॉ. जिनेंद्र दोभाडा यांनी विविध क्षेत्रातील कर्तुतत्वान स्त्रियांची माहिती दिली. पद्मश्री सिंधुताई सकपाळ, पद्मश्री राहीबाई पोपरे ,भारताचे खेळामध्ये नाव करणाऱ्या विविध महिला खेळाडू, विविध कंपन्यांच्या महिला अधिकारी यांचा दाखला घेऊन यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रियांका मोरे,
व मुख्याध्यापक भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षिका खरात यांनी तर सूत्रसंचालन मुलानी यांनी केले आभार प्रदर्शन देवकर यांनी केले.

हेही वाचा – कोंढेज येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

या कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय मोहोळकर साहेबराव आर्किले यांनी केले होते यावेळी रांगोळी स्पर्धा , संगीत कृषी स्पर्धा झाली व त्यातील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line