करमाळासोलापूर जिल्हा

महाशिवरात्री निमित्त श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाशिवरात्री निमित्त श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

केत्तर प्रतिनिधी – केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थान येथील महाशिवरात्री निमित्त श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि.०९ मार्च रोजी झाली.श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर यांच्या कडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.दि.२ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला होता.काकडा आरती,शिवलीलामृत ग्रंथ पारायण,ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप,गाथा भजन,हरिपाठ,प्रवचन,किर्तन,जागर असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.नाष्टा,दुपारचे जेवण,सायंकाळी च्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

महाशिवारात्री निमित्त संपन्न झालेल्या या श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला आहे असे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर यांचे कडून सांगण्यात आले.हभप अरुण महाराज पुंडे,हभप रामचंद्र महाराज भोसले,हभप राजाराम महाराज उदमले,हभप लहुदास महाराज देवकरा,हभप गोरख महाराज कुंभार,हभप संदीप महाराज शिंदे,हभप अर्जुन महाराज मोटे,हभप गोविंद महाराज शिंदे,हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे किर्तन सेवा संपन्न झाली.हभप संभाजी महाराज नागवडे यांचे भजन झाले.

हेही वाचा – पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन; रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम; वाचा सविस्तर

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर,श्री किर्तेश्वर देवस्थान अन्नछत्र समीती,श्री किर्तेश्वर देवस्थान नियोजन समीती,श्री किर्तेश्वर देवस्थान अध्यात्मिक समीती,श्री किर्तेश्वर देवस्थान उत्सव समीती च्या पदाधिकारी व केत्तूर ग्रामस्थांनी अन्नदांत्यांनी महाशिवरात्री निमित्त श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताह साठी परीश्रम घेतले.

litsbros