महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी! अखेर खातेवाटप जाहीर; वाचा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोठी बातमी! अखेर खातेवाटप जाहीर; वाचा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला असून अधिकृत खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याच्या मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला आहे. तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते दिले आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सहकार खात्याची धुरा सोपवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपावरून एक मत होत नसल्यानं खाते वाटप रखडल्याची माहिती समोर येत होती. मात्र अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. खाते वाटप जाहीर झालं आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!