माढ्यातील निर्धार मेळाव्यात हजारोंच्या उपस्थितीत रणजीत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
आ.बबनदादा शिंदे,आ. संजयमामा शिंदे व माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या उपस्थितीत
माढा/ प्रतिनिधी – नव्या पिढीचा अभ्यासू व कृतीशील उमेदवार म्हणून रणजित शिंदे यांना उमेदवारी दिली असून तुम्ही बांधल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल ते धोरण या प्रमाणे हजारों कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून माढा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरवल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.
ते माढा येथे रणजित शिंदे यांच्या उमेदवारी संदर्भात आयोजित कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात बोलत होते.
यावेळी आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांना भेटलो.त्यांच्या अटीही मान्य केल्या पण न्याय मिळाला नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बांधाल ते तोरण तुम्ही ठरवाल ते धोरण यानुसार रणजित शिंदेंना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.मला मागील तीस ते पस्तीस वर्षात मतदारांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. त्याप्रमाणेच रणजित शिंदेंवरही करावे.माढा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या माढा, पंढरपूर,माळशिरस तालुक्यातील गावात हजारों कोटींची विकासकामे केली आहेत.त्यामुळे जनता या निवडणुकीत नक्की साथ देणार आहे हे आजच्या मेळाव्याला उपस्थितीत 30 ते 35 हजारांहून अधिक जणांच्या उपस्थितीवरुन स्पष्ट झाले आहे.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की,रणजित शिंदे याने सामाजिक,शैक्षणिक , औद्योगिक व राजकीय क्षेत्रात मागील 25 वर्षांपासून सातत्याने काम केले आहे. आम्ही कारखानदार झालो म्हणून आमदार नाही झालो नाही तर समाजात सातत्याने काम केले आहे म्हणून आमदार आहे.मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावर आम्ही रणजीत शिंदे यांना या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरवले आहे त्याला आमदार करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार विनायकराव पाटील म्हणाले की,जनतेच्या न्यायालयात अखेरचा न्याय मागता येतो म्हणून आजच्या निर्धार मेळाव्यात रणजित शिंदेंना जनतेसमक्ष निवडणूक रिंगणात उतरवले असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. यापुढेही विकासाचा रथ अविरत चालू ठेवण्यासाठी रणजीत शिंदे यांना आमदार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मनोगताच्या माध्यमातून उमेदवार रणजीत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा उमेदवार रणजित शिंदे म्हणाले की,विकासकामे अडकून पडल्याने मध्यंतरी भूमिका वेगळी घेतली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनमताचा आदर करुन तुतारी मागितली मात्र विरोधकांनी मोठे षडयंत्र रचून तुतारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलोय.आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात सिना माढा उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली आले.सिना माढा उपसासिंचन योजना लाईट बिलासाठी कधीही बंद पडली नाही.खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेस उर्वरित योजनांसाठी निधी आणून त्या पूर्ण करण्यासाठी जनतेने या निवडणुकीत सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे,माजी आमदार विनायकराव पाटील, रमेश शिंदे,सुनंदाताई शिंदे, प्रणिता शिंदे,सरपंच यशवंत शिंदे,सरपंच संदीप पाटील, कृष्णा शिंदे,उपसभापती सुहास पाटील,उपाध्यक्ष अशोक लुणावत,झुंजार भांगे,अमोल चव्हाण,दिलीप घाडगे, आण्णासाहेब ढाणे,वामनभाऊ उबाळे,शहाजी चवरे,बंडूनाना ढवळे,शंभूराजे मोरे,संजय पाटील-भीमानगरकर,चंद्रशेखर गोटे,सचिन चवरे,अशोक चव्हाण,मानाजी माने,कुंडलिक रेडे-पाटील,सुभाष माने,सरपंच तानाजी लांडगे,सरपंच राजेंद्र खोत,उल्हास राऊत,पंडित पाटील यांच्यासह माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सुमारे 30 ते 35 हजारांहून अधिक लोक व कार्यकर्ते उपस्थित होते.
माढा मतदारसंघातील टेंभुर्णी व मानेगाव परिसरातील गावांमधील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दुचाकी व चारचाकी रॅलीच्या माध्यमातून रणजित शिंदे यांचे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.दोन्ही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी माढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करून मोठा हार घालत स्वागत करण्यात आले.
फोटो ओळी- माढा येथे आयोजित कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात हजारोंच्या संख्येने उपस्थितात समुदायासमोर बोलताना आ.बननदादा शिंदे बाजूला आ.संजयमामा शिंदे, उमेदवार रणजीत शिंदे, माजी आमदार विनायकराव पाटील व इतर मान्यवर.